घरदेश-विदेशगांधी स्मृतीच्या विशेष पत्रिकेत सावरकरांचं कौतुक, त्यावरून तुषार गांधींची टीका

गांधी स्मृतीच्या विशेष पत्रिकेत सावरकरांचं कौतुक, त्यावरून तुषार गांधींची टीका

Subscribe

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी 'अंतिम जन' या पत्रिकेच्या विशेष अंकावर टीका केली आहे.

भारतात(india) सध्या सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरम्यान भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाशी संलग्न असलेली ‘गांधी स्मृती’ या संसथेने सुद्धा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून ‘अंतिम जन'(antim jan) नावाची एक पत्रिका प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे ही पत्रिका स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर(vinayak damodar savarkar) यांना समर्पित आहे. पण या पत्रिकेला मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी ‘अंतिम जन’ या पत्रिकेच्या विशेष अंकावर टीका केली आहे. यावेळी आरोप करत तुषार गांधी म्हणाले, की गांधीवादी विचारधारा भ्रष्ट करण्यासाठी ही पत्रिका काढली असा आरोप तुषार गांधी(tushar gandhi) यांनी केला.

हे ही वाचा – Mahatma Gandhi Death Anniversary : महात्मा गांधींच्या पुण्यातिथीनिमित्त पंतप्रधान मोदी व राहुल…

- Advertisement -

गांधी स्मृती संस्थेकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कौतुक

गांधी स्मृती संस्था ही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय त्यांच्या अंतर्गत येते. महात्मा गांधी(mahatma gandhi) आणि त्यांची तत्वे यांना समर्पित असणारी ही संस्था आहे. हीच संस्था राजघाटावरील गांधी स्मारक आणि गांधींची हत्या झालेल्या घराचे (म्हणजे सध्याचे संग्रहालय) संवर्धन सुद्धा करते. यातच विशेष बाब म्हणेज महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारधारा ही पूर्णपणे एकमेकांविरुद्ध आहे. गांधी स्मृती संस्थेने एक पत्रिका काढली मात्र त्यात सावरकरांचे कुटून करण्यात आले आहे. त्यामुळे त्या पत्रिकेवर टीका करण्यात येत आहे. या पत्रिकेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर(vinayak damodar savarkar) यांच्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित एकूण १३ लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. तर महात्मा गांधी यांच्यावर केवळ ३ लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यावरूनच या पत्रिकेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Mahatma Gandhi Death Anniversary : …अन् 30 जानेवारीला पाया पडण्याचे नाटक करत गांधींवर…

तुषार गांधी यांची टीका

महात्मा गांधी(mahatma gandhi) यांचे पणतू तुषार गांधी(tushar gandhi) यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर आणि त्यांच्या तत्वज्ञानावर मोठ्या प्रमाणात संशोधन युद्ध केले आहे. त्याचबरोबर त्यांनी गांधींवर पुस्तके सुद्धा लिहिली आहेत. द हिंदू यांच्या वृत्तानुसार, तुषार गांधी आक्षेप घेत म्हणाले, की सावरकरांना समर्पित ही पत्रिका काढण्यामागे गांधीवादी विचारसरणीला भ्रष्ट करण्याची सुनियोजित रणनीती असल्याची टीका केली आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन यांनी सुद्धा हा आरएसएस चा अजेंडा असल्याचा आरोप आरोप केला आहे.

हे ही वाचा – रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत ८० रुपयांच्या निचांकी पातळीवर

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -