महागाई भत्ताच्या कॅलक्युलेशनमध्ये बदल, Labor Ministry कडून नवे बेस इअर जाहीर

savings central government employees rate of da revises rate of dearness allowance 7th pay commission
महागाई भत्ताच्या कॅलक्युलेशनमध्ये बदल, Labor Ministry कडून नवे बेस एअर जाहीर

कामगार मंत्रालयाने (Labor Ministry) महागाई भत्त्याच्या कॅलक्युलेशनचा फॉर्मूला बदलण्याचे संकेत दिले आहे. २०१६ च्या आधारभूत वर्षासह वेतन दर निर्देशांक (WRI) ची नवी सीरिज जारी केली आहे. याची देखभाल मंत्रालयाच्या कामगार विभागाकडून केली जाते. कामगार मंत्रालयाने सांगितले की, WRI ची २०१६ ची नवीन सीरिज वर्ष १९६३-६५ च्या जुन्या सिरिजची जागा घेईल.

सरकार करणार मूळ वर्षात बदल

एजी ऑफिस ब्रदरहुडचे माजी अध्यक्ष हरिशंकर तिवारी यांच्या मते, महागाईच्या आकडेवारीच्या आधारे सरकार वेळोवेळी मुख्य आर्थिक निर्देशकांमध्ये संशोधन करत असते. जेणे करुन अर्थव्यवस्था येणाऱ्या बदलांना प्रतिबिंबित केले जाऊ शकेल आणि कामगारांच्या वेतानाचे स्वरुप सुधारता येईल.

कामगार संघटनेने केली होती शिफारस

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO), राष्ट्रीय सांख्यिकी आयोग इत्यादींच्या शिफारशींनुसार, व्याप्ती वाढवण्यासाठी आणि निर्देशांक अधिक चांगला करण्यासाठी कामगार ब्युरोने वेतन दर निर्देशांकाचे मूळ वर्ष १९६३-६५ मध्ये बदल करत ते २०१६ केले आहे.

महागाई भत्ता कसा मोजला जातो (DA गणना सूत्र)

सध्याच्या महागाई भत्त्याच्या दराला तुमच्या मूळ वेतनाने गुणले जाते. यानंतर महागाई भत्त्याची रक्कम मिळते.
उदाहरणार्थ, सध्याचा दर १२ टक्के आहे. यात तुमचा मूळ पगार रु ४९००० DA (४९००० x१२)/१०० असं असेल.

महागाई भत्ता काय आहे

महागाई भत्ता हा पगाराचा एक घटक समजला जाऊ शकतो, जो मूळ वेतनाची काही टक्केवारी आहे. महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी महागाई भत्ता दिला जातो. DA थेट उपजीविकेच्या खर्चाशी संबंधित असल्याने, DA घटक वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या पदानुसार भिन्न असतो. याचा अर्थ शहरी क्षेत्र, निमशहरी क्षेत्र किंवा ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी DA वेगळा आहे.