घरताज्या घडामोडीVideo -अजबच! दोन तोंडांची मांजर; नाव ठेवलं 'बिस्किट' आणि 'ग्रेव्ही'

Video -अजबच! दोन तोंडांची मांजर; नाव ठेवलं ‘बिस्किट’ आणि ‘ग्रेव्ही’

Subscribe

अमेरिकेच्या ओरेगॉनमधील एका कुटुंबात अजबच घटना घडली आहे. किंग या कुटुंबात दोन तोंडांच्या मांजरीने जन्म घेतला आहे. गेल्या बुधवारी किंग यांच्या कुटुंबात एका मांजरीने सहा पिल्लांना जन्म दिला. त्यापैकी एका पिल्लाला दोन तोंड असल्याचे समोर आले. किंग कुटुंबातील या दुर्मिळ मांजराच्या पिल्लाने सगळ्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

या कुटुंबातील बीजे किंगने सीएनएनला सांगितले की, ‘माझी बायको त्या मांजराला पाहण्यासाठी बाहेर गेली आणि तिला सहा पिल्ले दिसली त्यातल्या एका मांजरीच्या पिल्लाला दोन तोंड असल्याचे आढळले. आम्ही याबद्दल कधीच विचारही केला नव्हता. इतके विलक्षण होते. असं प्रत्यक्षात पाहणं खूप दुर्मिळ आहे.’

- Advertisement -

त्या दोन तोंडी मांजराचे नाव त्यांनी ‘बिस्किट’ आणि ‘ग्रेव्ही’ असं ठेवलं आहे. या कुटुंबाने या दोन तोंडी मांजराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे ‘बिस्किट’ आणि ‘ग्रेव्ही’ फारच चर्चेत आले आहेत.

- Advertisement -

दोन तोंडांससह जन्मलेल्या मांजरींना ‘जेनस’ म्हणून ओळखले जाते. दोन चेहऱ्याचा रोमन गॉड जॅनस याच्या नावावरून हे नाव ठेवलं आहे. दुर्देव म्हणजे अशा मांजरी एका दिवसापेक्षा जास्त काळ जिवंत राहत नाहीत. पण किंग कुटुंब त्या मांजराला जिवंत ठेवण्यासाठी तिची देखभाल करत आहेत.

यापूर्वी अशा दोन तोंडांच्या मांजरीचे पिल्लू ‘फ्रँक’ आणि ‘लुई’ १५ वर्ष जगले होते आणि २००६ मध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ‘फ्रँक’ आणि ‘लुई’ची नोंद करण्यात आली होती.


हेही वाचा – Coronavirus: वुहानच्या लॅबमध्ये तीन प्रकारचे व्हायरस सापडले, मात्र कोरोनासारखा नाही


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -