घरट्रेंडिंगअलर्ट! SBI ग्राहकांनो ताबडतोब मोबाईलमधून 'हे' अॅप काढून टाका!

अलर्ट! SBI ग्राहकांनो ताबडतोब मोबाईलमधून ‘हे’ अॅप काढून टाका!

Subscribe

एसबीआयने ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. बँकेने एक ट्विट करुन लोकांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. अनधिकृत मोबाइल अॅपचा वापर न करण्याचा सल्ला बँकेने आपल्या ग्राहकांना दिला आहे. एसबीआयने म्हटले की,  मोबाइल अॅप हॅकर्स तुमच्या मोबाइलवर नियंत्रण मिळवून ते तुमचे कॉन्टॅक्ट, पासवर्ड आणि आर्थिक अकाउंट्सचे अॅक्सेस मिळवून देतात.

- Advertisement -

काय म्हटलय ट्विटमध्ये

एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, काही मोबाइल अॅप्लिकेशन तुमची महत्त्वाची माहिती, वैयक्तिक माहिती सार्वजनिक करु शकतात. या कॅप्शनसोबत एक फोटो पोस्ट केली आहे. ज्यात सुरक्षा विषयीच्या अनेक टिप्स सांगितल्या आहेत.

एसबीआयने सांगितलेल्या महत्त्वाच्या टीप्स

  •  ग्राहकांनी नेहमी अधिकृत अॅप डाऊनलोड करायला हवे.
  • कोणतेही अॅप इन्स्टॉल करण्याआधी अधिकृत असल्याची खात्री करून घ्यावी
  • कोणत्याही अॅपमध्ये डेबिट किंवा क्रेडिट कार्ड्सची माहिती सेव्ह करु नका.
  • आपल्या स्मार्टफोनला नियमित अपडेट करीत राहा.
  • फ्री मिळणाऱ्या स्क्रीनसेव्हरपासून दूर राहा.
  • फॉरवर्ड मेसेज मिळणाऱ्या कोणत्याही संशयित लिंकला क्लिक करु नका.

हे ही वाचा – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोरोनाचा अहवाल आला…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -