घरअर्थजगतSBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! १ जुलैपासून Cash Withdrawal साठी असणार नवा नियम

SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! १ जुलैपासून Cash Withdrawal साठी असणार नवा नियम

Subscribe

तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे ग्राहक आहात का? असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची…१ जुलैपासून स्टेट बँक ऑफ इंडिया सर्व्हिस चार्ज नियमात बदल करणार आहे. म्हणजेच गुरुवारपासून एसबीआय तुमच्या एटीएम आणि बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी सेवा शुल्कामध्ये बदल करणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे नवीन शुल्क चेक बुक आणि इतर गैर-आर्थिक व्यवहारांवर लागू असणार आहेत. यासह एसबीआय आर्थिक वर्षात बीएसबीडी खातेधारकांना १० चेक विनामूल्य देणार आहे. परंतु त्यानंतर एसबीआय चेक देण्यासाठी काही रक्कम आकारणार आहे. उदाहरणार्थ, १० पानांच्या चेकबुकवर जीएसटी लावून ४० रुपये आकारले जातील. तर दुसरीकडे २५ पृष्ठांच्या चेकबुकवर ७५ रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

यासह ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवरील या नवीन सेवा शुल्कामधून सूट देण्यात येणार आहे. एसबीआयच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, बीएसबीडी खातेधारकांना एटीएम आणि बँक शाखेतून रोख रक्कम काढण्यासाठी दरमहा चार वेळा मोफत मर्यादा दिली जाणार आहे. त्याचबरोबर, ही मर्यादा संपल्यानंतर बँक प्रत्येक व्यवहारासाठी जीएसटीसह १५ रुपये घेणार आहे. गृह शाखा एटीएम आणि एसबीआयचे एटीएम नसल्यास रोख पैसे काढल्यानंतर हे शुल्क लागू होणार आहे.

- Advertisement -

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सवलत

बँकेने ज्येष्ठ नागरिकांना सेवा शुल्कापासून सूट दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर हे नवीन सेवा शुल्क द्यावे लागणार नाही. एसबीआय बीएसबीडी झीरो बॅलेन्स अकाऊंट म्हणून ओळखले जाते. हे खाते प्रामुख्याने समाजातील गरीब घटकांसाठी उघडले जाते. यामध्ये बँक नियमित बचत बँक खात्यांप्रमाणे झीरो बॅलेन्स खात्यावर समान व्याज दर देते. त्यामुळे कोणतेही अधिकचे शुल्क आकारले जाणार नाही.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -