घरताज्या घडामोडीSBI बँकेने ATM मधून पैसे काढण्यासाठी आणला 'हा' नवीन नियम!

SBI बँकेने ATM मधून पैसे काढण्यासाठी आणला ‘हा’ नवीन नियम!

Subscribe

ATM किंवा डेबिड कार्ड या मार्गातून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने यंदा नववर्षाच्या सुरूवातीला एक नियम लागु केला होता. ज्यानुसार ग्राहकांना १० हजाराच्या वरील रक्कम एटीएममधून काढायची असल्यास त्यांना OTP टाकणे अनिवार्य करण्यात आले होते हाच नियम आता १८ सप्टेंबर पासून देशभरात दिवसातील २४ तासांसाठी लागु करण्यात येणार आहे. त्या आधी सर्व ग्राहकांनी आपले बँक अकाऊंट आणि मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यावे अश्या सुचना करण्यात आल्या आहेत.

या आधी हा नियम लागू करण्यात आला होता तेव्हा रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेसाठी हा नियम ठेवण्यात आला होता. मात्र १८ सप्टेंबरपासून शुक्रवारपासून हा नियम २४ तासांसाठी लागु असणार आहे.  त्यामुळे यापुढे SBI च्या कोणत्याहे एटीएम मधुन १० हजाराच्या वरची रक्कम काढायची झाल्यास तुमचा मोबाईल जवळ असणे आणि हा मोबाईल क्रमांक बॅंक अकाउंट ला लिंक असणं गरजेचं आहे.

- Advertisement -

रात्री चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ

स्टेट बँकेच्या निरिक्षणात समोर आलेल्या माहिती नुसार, एटीएममधील ६८ टक्के चोऱ्या रात्रीच्या वेळी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा मार्ग अवलंबण्यात आला आहे. हा ओटीपी केवळ एका व्यवहारासाठी असणार आहे. दुसऱ्यांदा त्याचा वापर होणार नाही. तसेच हा ओटीपी काही मिनिटांसाठीच उपयुक्त असणार आहे. ग्राहकाने या कालावधीत व्यवहार पूर्ण केला नाही, तर तो ओटीपी निष्क्रिय होणार आहे.


हे ही वाचा – खासदार रवी किशन यांना जयाप्रदा यांची साथ म्हणाल्या, राजकारण करू नका!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -