Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 5 हजाराहून अधिक...

SBI Clerk Recruitment 2021: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 5 हजाराहून अधिक लिपीक पदासाठी भर्ती

Related Story

- Advertisement -

SBI Clerk Recruitment 2021, देशात कोरोना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असतानाच स्टेट बँक ऑफ इंडियाने मोठी भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने सुवर्णसंधी आणली आहे. एसबीआयमध्ये तब्बल ५२३७ लिपीक ( Clerk)पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या पदासाठीची अर्ज प्रक्रिया २७ एप्रिल २०२१ म्हणजे आजपासून सुरु झाली आहे. तर 17 मे 2021 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (SBI Clerk Notification 2021 Out for 5454 Junior Associates Posts)

परीक्षेचे स्वरुप

दरम्यान या भरती प्रक्रियेसाठी तीन परिक्षा होणार आहेत. एक परिक्षा पूर्व ट्रेनिंग कॉल लेटर परीक्षा जी 26 मे 2021 होणार आहे. त्यानंतर प्रीलिमिनरी परिक्षा जी जून 2021 मध्ये होईल व त्यानंतर मुख्य परिक्षा जी 31 जुलै, 2021 होणार आहे. सुरुवातीला एक ऑनलाईन आणि नंतर मुख्य परिक्षा (SBI Preliminary & Main exam) घेण्यात येणार आहे. यामध्ये स्थानिक भाषेची निवड करता येणार आहे. 100 अंकांची पहिली परिक्षा असणार आहे. एक तासाची ही परिक्षा असणार असून इंग्रजी, गणित आणि तर्क क्षमतेवर आधारित असणार आहे. त्यामुळे प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस पात्र ठरवले जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

- Advertisement -

इच्छुक उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांकडे 01 जानेवारी 2021 च्या आधीचे integrated dual degree (IDD) प्रमाणपत्र आहे ते या पदासाठी अर्ज करू शकतात. जे पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत, तेही या पदासाठी अर्ज करु शकतात.

वयाची अट

या पदासाठी उमेदवाराला वयाची अट 1 एप्रिल 2021 नुसार कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 वर्षे असणे गरजेचे आहे. तसेच एससी, एसटी, ओबीसी, पीडब्ल्यूडी, सेवानिवृत्त आणि महिला, विधवांसाठी वयाची अट शिथिल करण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला एसबीआयची अधिकृत वेबसाईट पाहावी लागणार आहे.

अर्ज शुल्क

- Advertisement -

भरतीचे अर्ज शुल्क सामान्य आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी 750 रुपये ठेवण्यात आले आहे. तर आरक्षणातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

या पदासाठी अर्ज करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अधिकृत वेबसाईट पाहा.
sbi.co.in


 

- Advertisement -