घरदेश-विदेशएसबीआयने अदानीला दिले २७ हजार कोटींचे कर्ज

एसबीआयने अदानीला दिले २७ हजार कोटींचे कर्ज

Subscribe

अमेरिकेतील हिडेनबर्ग संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात अदानी समूहाला एसबीआयने दिलेल्या कर्जाची माहिती देण्यात आली आहे. एसबीआयने अदानी समूहाला २१ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. एसबीआयच्या नियमानुसार जेवढे कर्ज द्यायला हवे त्याच्या अर्धी ही रक्कम आहे. त्यावर खारा म्हणाले, एसबीआय बॅंकेने दिलेल्या कर्जाची परतफेड अदानी समूह करत आहे. त्यात काही अडचण आलेली नाही. 

नवी दिल्लीः भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) अदानी समूहाला २७ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. शेअर स्वरूपात कोणतेही कर्ज अदानी समूहाला दिलेले नाही.  बॅंकेने दिलेल्या एकूण कर्जाच्या 0.88 टक्के हे कर्ज आहे. कर्ज फेडण्यात अदानी समूह असमर्थ आहे असे बॅंकेला वाटत नाही, असे बॅंकेचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांनी सांगितले.

खारा म्हणाले, अदानी समूहाला कर्ज देताना त्यांची संपत्ती व रोकड व्यवहाराचा तपशील तपासण्यात आला. तसेच अदानी समूहाचा कर्ज परतफेड करण्याचा रेकॉर्डही चांगला आहे.

- Advertisement -

अमेरिकेतील हिडेनबर्ग संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात अदानी समूहाला एसबीआयने दिलेल्या कर्जाची माहिती देण्यात आली आहे. एसबीआयने अदानी समूहाला २१ हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. एसबीआयच्या नियमानुसार जेवढे कर्ज द्यायला हवे त्याच्या अर्धी ही रक्कम आहे. त्यावर खारा म्हणाले, एसबीआय बॅंकेने दिलेल्या कर्जाची परतफेड अदानी समूह करत आहे. त्यात काही अडचण आलेली नाही.

- Advertisement -

हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले. हिडनबर्गचा अहवाल खोटा असल्याचा दावा अदानी समुहाने केला आहे. गुरुवारी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना आदेश जारी केले आहेत. अदानी समुहाला नेमके किती कर्ज दिले याचा तपशील सर्व बॅंकांना देण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने जारी केले आहेत.

तसेच तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा मित्रा यांनी अदानी समूहावर निशाणा साधला आहे. गौतम अदानी यांचे नातलग सेबीमध्ये आहेत. त्यांच्या आडूनच सर्व हेराफेरी सुरु आहे. दिग्गज वकील सिरील श्रॉफ यांच्या मुलीचा विवाह गौतम अदानी यांच्या मुलासोबत झाला आहे. श्रॉफ हे सेबीच्या एका समितीचे सदस्य आहेत. सेबी जर अदानी यांची चौकशी करणार असेल तर श्रॉफ यांनी हे सदस्य पद सोडायला हवे, अशी मागणी खासदार मोइत्रा यांनी केली आहे.

हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -