SBI Notification 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती, ४० हजारांपेक्षा अधिक पगार, असा करा अर्ज

SBI Notification 2021 notification for 2056 vacancies out how to apply sbi probationary officer posts
SBI Notification 2021: एसबीआयमध्ये ऑफिसर पदासाठी मोठी भरती, ४० हजारांपेक्षा अधिक पगार, असा करा अर्ज

SBI PO Notification 2021, Sarkari Naukri 2021: स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पद भरतीसाठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. तब्बल २०५६ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे सरकारी बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन आजचं अर्ज करा. या पदासाठीची अर्जप्रक्रिया ५ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे, त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या sbi.co.in या वेबसाईटवरील करिअर टॅबवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरु शकता. ही अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आहे.

प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी पूर्व परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. लवकरचं या परीक्षांच्या अधिकृत तारखा जाहीर होणार आहेत.

पदासाठीची पात्रता

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असणं अनिवार्य आहे. त्यामुळे इच्छिुक उमेदवाराने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरील नोटिफिकेशन वाचूनचं अर्ज सादर करावा.

वयाची अट

प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३० पर्यंत असावे. स्टेट बँकेच्या नियमानुसार, आरक्षित प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूटही देण्यात येणार आहे. तसेच एकून २०५६ जागांपैकी २०० जागा या EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

कशी असेल भरती प्रक्रिया?

ऑफिसर पदावर नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला प्रिलिम्स, मेन, इंटरव्ह्यू राऊंड आणि प्री एक्झाम ट्रेनिंगही क्लिअर म्हणजेच पास करावी लागणार आहे. याशिवाय जे उमेदवार पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टरमध्ये असतील त्यांना देखील काही अटींचं पालन करून अर्ज करता येणार आहे. जर ते पास झाले आणि त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलचं तर त्यांना ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी परीक्षा दिल्याचा अधिकृत पुरावा सादर करावा लागणार आहे. या संपूर्ण निवड प्रक्रियाच्या अटी नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळेल.

उमेदवारांनी किती मिळेल वेतन?

अंतिम फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना चार आगाऊ वेतनवाढीसह २७,६२० रूपये बेसिक पगार दिला जाईल. या उमेदवारांचा मुळ पगार २३,७०० ते ४२.०२० रूपयांदरम्यान असेल. पगाराव्यतिरिक्त उमेदवारांना DA, HRD, CCA आणि अन्य भत्तेही दिले जातील. निवड झालेल्या उमेदवारांना निवडीच्या वेळी दोन लाख रूपयांच्या बॉन्डवर सही करावी लागेल. त्यानुसार उमेदवारांना किमान तीन वर्षांसाठी बँकेत नोकरी करावी लागणार आहे.

असा करा ऑनलाईन अर्ज

१) सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत sbi.co.in वेबसाईटवर जा.

२) यानंतर वेबसाईट होम पेजवरील current openings लिंकवर क्लिक करा.

३) आता RECRUITMENT OF PROBATIONARY OFFICERS ADVERTISEMENT NO: CRPD/PO/2021-22/18 या लिंकवर क्लिक करा.

४) नंतर नवीन नोंदणीसाठी क्लिक करा.

५) शेवटी वैयक्तिक माहिती सादर करा आणि अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या.