घरताज्या घडामोडीVideo : बँक खातं सुरक्षीत ठेवा, SBI ने ग्राहकांसाठी दिल्या खास टिप्स!

Video : बँक खातं सुरक्षीत ठेवा, SBI ने ग्राहकांसाठी दिल्या खास टिप्स!

Subscribe

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपलं बँकेतील अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांना खास टिप्स दिल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या सूनचा ग्राहकांना दिल्या आहेत. इ बँकीग करताना मोबाईलच्या यूएसबी डिव्हाईसच्या मदतीने सहज मेलवेयर इन्फेक्शन होऊ शकते. कारण, अनेक वेळा त्यांना डिव्हाईसेजला लावले जाते. तसेच विना सेफ्टीचे युजर्स त्याचा वापर करीत असतात. त्यामुळे डेटा चोरी आणि व्हायरस इन्फेक्शनसाठी जबाबदार यूएसबी डिव्हाईसेजचा सुरक्षित वापर कसा करायचा याची पद्धत स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितली आहे.

- Advertisement -

 

एसबीआयने दिल्या टिप्स

स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ट्विटमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे.  त्याचबरोबर म्हटले आहे की, जर तुम्ही एखादी चूक केली तर तुमच्या यूएसबी डिव्हाईसला धोकादायक मेलवेयर इन्फेक्टेड होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही या टिप्स फॉलो करा आणि अकाऊंट सुरक्षीत ठेवा.

- Advertisement -

ग्राहकांनो हे करा

१. यूएसबी डिव्हाईसला अॅक्सेस करण्याआधी लेटेस्ट अँटिव्हायरस स्कॅन करा

२. डिव्हाईसवर पासवर्ड प्रोटेक्शन लावून ठेवा

३. बँक स्टेटमेंट संबंधी फाईल्स आणि फोल्डर्सला एनक्रिप्ट करा.

४. यूएसबीमध्ये डेटा कॉपी करण्यासाठी यूएसबी सिक्योरिटी प्रोडक्ट्सचा वापर करा.

ग्राहकांनो हे करू नका

१. अज्ञात लोकांपासून कोणत्याही प्रकारची प्रमोशनल डिव्हाईस अॅक्सेप्ट करू नका

२. बँक डिटेल्स, पासवर्ड यूएसबी डेस्कवर ठेऊ नका

३. कधीही व्हायरस इन्फेक्टेड सिस्टम मध्ये आपला यूएसबी डिव्हाईस प्लग इन करू नका.


हे ही वाचा – भयंकर! कोरोनाग्रस्ताचा मृतदेह रस्त्यात टाकून रूग्णवाहिका निघून गेली!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -