SBI New Scheme: स्वस्त दरात होम लोनपासून ते Fixed deposit रकमेवर ग्राहकांना मिळणार लाभ

योजनेचं नाव प्लॅटिनम डिपॉजिट असून ही योजना फक्त काही दिवसांपूर्तीच मर्यादित असणार आहे.

SBI platinum deposit scheme
SBI New Scheme: स्वस्त दरात होम लोनपासून ते Fixed deposit रकमेवर ग्राहकांना मिळणार लाभ

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशातील सर्वात मोठ्या बँकेने म्हणजेच स्टेट बँक तर्फे ग्राहकांसाठी नव्या ऑफरची घोषणा करण्यात आली आहे.(SBI New Scheme) सवलतीच्या दरात कर्जापासून ते विशेष ठेव योजनांवर खास ऑफर ग्राहकांना देण्यात आली आहे. (SBI platinum deposit scheme) एसबीआयने एक विशेष ठेव योजना, एफडी आणि टर्म डिपॉजिट अंतर्गत काही नवे नियम जाहीर केले आहेत. या ऑफर्समध्ये सर्व ग्राहकांना आणि वरिष्ठ नागरिकांना जास्त प्रमाणात व्याजदर देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेचं नाव प्लॅटिनम डिपॉजिट असून हि योजना फक्त काही दिवसांपूर्तीच मर्यादित असणार आहे. एसबीआयने त्यांच्या अधीकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनूसार येत्या 14 सप्टेंबरला ही योजना समाप्त होणार आहे.(SBI Special Deposit scheme)

स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या अमृत मोहोत्सवानिमित्त एसबीआय टर्म डिपॉजिट आणि स्पेशल डिपॉजिवर ग्राहकांना विशेष लाभ घडवून देणारी योजना जाहीर केली आहे.

SBI प्लॅटिनम डिपॉजिट स्कीम-

एसबीआयच्या या नव्या योजने अंतर्गत ग्राहकांना 75 दिवस ,75 आठवडे आणि 75 महिनांच्या कालावधी अंतर्गत येणाऱ्या एफडीसाठी 0.15 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत 2 करोड रुपयांपेक्षा अधिक टर्म डिपॉजिटवर ग्राहकांना हा लाभ मिळणार आहे.  सध्या, एसबीआय 75 दिवसांच्या मुदत ठेवीवर 3.90 टक्के व्याजदर आकारण्यात येत आहे परंतु विशेष ऑफर अंतर्गत 3.95 टक्के व्याजदराचा लाभ मिळू शकतो. त्याचप्रमाणे 75 आठवडे किंवा 525 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 5 टक्के व्याज आता उपलब्ध होते. पण नव्या योजने अंतर्गत आता 5.10 टक्के व्याज मिळेल. त्याचप्रमाणे 75 महिने किंवा 2250 दिवसांच्या एफडीवर आता 5.40 टक्के व्याज मिळते, जे नवीन योजनेअंतर्गत 5.55 टक्के होईल.

याचप्रमाणे एसबीआयने पर्सनल लोनवर देखील नवी ऑफर जाहीर केली आहे. होम लोनसाठी झीरो प्रोसेसिंग फीस आकारण्यात येणार आहे. महिलांसाठी तसेच योनो अॅप अंतर्गत आवेदन करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी 0.05 टक्के व्याजदर आकारण्या येणार आहे. अशी महत्वपूर्ण घोषणा एसबीआयने केली आहे.


हे हि वाचा – बँकेत चोरी झाल्यास घाबरु नका, खातेधारकांना मिळणार नुकसान भरपाई,RBI ने जाहीर केले नवे नियम