घरदेश-विदेशSBI ची ग्राहकांसाठी मोठी बातमी; बँकेकडून मार्चपर्यंत उपलब्ध होणार 'या' सुविधा

SBI ची ग्राहकांसाठी मोठी बातमी; बँकेकडून मार्चपर्यंत उपलब्ध होणार ‘या’ सुविधा

Subscribe

जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयोगाची आहे. कारण एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवीवर (FD) जास्त परतावा देत आहे. एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजनेचा पुन्हा एकदा विस्तार केला आहे.

चांगल्या प्रतिसादामुळे बँकेने योजनेत केली वाढ

देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील कर्जदार SBI च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी SBI Wecare विशेष मुदत ठेव योजना 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. SBI ने ही योजना 2020 मध्ये सुरु केली होती. ज्याला ज्येष्ठ नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. ज्यामुळे आता बँकेने त्यात पुन्हा वाढ केली आहे.

- Advertisement -

सीबीआयच्या वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष FD योजना SBI Wecare मध्ये पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या FD वर 30 बेस पॉइंट्सचे अतिरिक्त व्याज उपलब्ध केला आहे. एफडीवर बँकेकडून 5 वर्षांसाठी 5.65 टक्के व्याज दिले जाते, परंतु विशेष योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच वर्षांसाठी एफडीवर 6.45 टक्के व्याज दिले जाते.

एसबीआयने (SBI) 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या 2 कोटी रुपयांपर्यंतच्या FD वरील व्याजदर 15 बेस पॉइंट्सने वाढवला आहे. हा वाढीव दर 13 ऑगस्टपासून लागू करण्यात आला आहे. SBI सामान्य नागरिकांना FD वर 2.90 टक्के ते 5.65 टक्क्यांपर्यंत व्याज दिला जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेल्या एफडीवर बँक 3.40 टक्क्यांवरून 6.45 टक्के व्याज देईल.


खाकी वर्दी घालून नाचणाऱ्या पोलिसांसाठी सूचना, गणेश विसर्जन मिरवणुकीची महासंचालकांकडून गंभीर दखल


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -