घरदेश-विदेशसन २०३०मध्ये 'हे' होणार सरन्यायाधीश; कॉलिजिअमकडून घोषणनेनंतर चर्चा

सन २०३०मध्ये ‘हे’ होणार सरन्यायाधीश; कॉलिजिअमकडून घोषणनेनंतर चर्चा

Subscribe

 

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयातील वरीष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन हे २०३० साली सरन्यायाधीश होतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. ही चर्चा खरी ठरण्याची शक्यता आहे आहे. कारण विश्वनाथन यांची सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस कॉलिजिअमने केली आहे. केंद्र सरकारने यावर शिक्कामोर्तब केल्यास सेवा जेष्ठतेनुसार विश्वनाथन हे २०३० साली नक्कीच सरन्यायाधीश होतील, असे बोलले जात आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे बार कौन्सिलमधून सरन्यायाधीशपदापर्यंत पोहोचणारे विश्वनाथन हे चौथे वकील ठरतील. न्या. एस. एस. सिक्री, न्या. एस.सी. रॉय, न्या. कुलदीप सिंग, न्या. संतोष हेगडे, न्या. आर. नरिमन. न्या. यू. यू. ललित, न्या. एल. नागेश्वर राव, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. पी. एस. नरसिम्हा यांची निवड बार कौन्सिलमधून झाली आहे. बार कौन्सिलमधून न्यायमूर्ती निवड होणाऱ्यांची टक्केवारी ०.००३३% आहे. यातील इंदी मल्होत्रा या पहिल्या महिला न्यायमूर्ती आहेत. न्या. सिक्री आणि न्या. ललित यांना सरन्यायाधीशपदी बढती मिळाली. तर न्या. नरसिम्हा हे ३० ऑक्टोबर २०२७ ते मे २ मे २०२८ या कालावधीत सरन्यायाधीश असतील.

विश्वनाथन यांच्या नावावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यास ते १० वे सरन्यायाधीश होतील. न्या. जे. बी. पारधीवाला हे सरन्यायाधीश म्हणून ११ ऑगस्ट २०३० रोजी निवृत्त होणार आहे. त्यानंतर विश्वनाथन हे सरन्यायाधीश होतील. त्यांचा कार्यकाळ २५ मे २०३१ पर्यंत असेल.  विश्वनाथ हे ३० वर्षांपेक्षा अधिककाळ वकीली करत आहेत. त्यांनी Additional Solicitor General म्हणूनही काम केले आहे. एप्रिल २००९ पासून ते सर्वोच्च न्यायालयात वकीली करत आहेत.

- Advertisement -

सरन्यायाधीशपदी सर्वाधिक कार्यकाळ असल्याचा मान विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांना मिळाला आहे. ८ नोव्हेंबर २०२२ ते १३ मे २०१६ असा सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा कार्यकाळ असणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीटाने नुकताच महाराष्टातील सत्तासंघर्षाचा निकाल दिला. या घटनापीठात न्या. पी. आर. नरसिम्हा हेही होते. त्यांचीही सरन्यायाधीशपदी वर्णी लागणार आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -