काँग्रेस नेते पवन खेरांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, अंतरिम जामीन मंजूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही तासांनंतरच सर्वोच्च न्यायालयाने पवन खेरा यांना मोठा दिलासा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटक करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही तासांनंतरच सर्वोच्च न्यायालयाने पवन खेरा यांना मोठा दिलासा दिला. सर्वोच्च न्यायालयाने पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर केला. (SC Directs Dwarka Court To Grant Interim Relief To Congress Pawan Khera)

पवन खेरा यांना आज सकाळी आसाम पोलिसांकडून दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्यानंतर खेरा यांनी या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली. त्यानंतर न्यायालयाने पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

नेमके प्रकरण काय?

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहावर गंभीर आरोप झाले होते. त्यावेळी विरोधी पक्षांनी त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. तसेच, पवन खेरा यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीप्पणी केली होती. ‘वाजपेयींनी संयुक्त संसदीय समिती बनवली होती, मग नरेंद्र गौतम दास मोदी यांना समिती स्थापन करण्यात काय अडचण आहे?’, असा सवाल पवन खेरा यांनी उपस्थित केला होता. पवन खेरा यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाकडून खेरा यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंत आज खेरा यांना दिल्ली विमानतळावर प्रवास करण्यापासून रोखण्यात आले.

दिल्ली पोलिसांनी पवन खेरा यांच्यावर अटकेची कारवाई केली. त्यानंतर काँग्रेसने या प्रकरणाविरोधात तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आज दुपारी चार वाजताच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर पवन खेरा यांच्या जामीनासाठी सुनावणी पार पडली.

दरम्यान, पवन खेरा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली विमानतळ परिसरात आंदोलन सुरू केले.


हेही वाचा – पवन खेरांच्या अटकेनंतर राऊतांची भाजपावर टीका; म्हणाले, ‘हा नियम फक्त विरोधकांसाठीच…’