Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश कोरोनानंतर खटल्यांचा सामना करणं आव्हानात्मक; मध्यस्थीला अधिक प्राधान्य असेल - न्यायमुर्ती कौल

कोरोनानंतर खटल्यांचा सामना करणं आव्हानात्मक; मध्यस्थीला अधिक प्राधान्य असेल – न्यायमुर्ती कौल

Related Story

- Advertisement -

देशात येणाऱ्या काळात कोर्ट कचेऱ्यांपेक्षा मध्यस्थीने वाद सोडवण्याचं पहिलं पाऊल असेल, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल यांनी शनिवारी व्यक्त केलं. कोविड-१९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर खटल्यांचा सामना करणं एक आव्हानात्मक असणार आहे, असं देखील ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाद्वारे प्रशिक्षित मध्यस्थ-निवारण आयोजित ‘इंटरनॅशनल व्हर्च्युअल मीडिएशन समर स्कूल, २०२१’ च्या समारोप सत्रावेळी ते संबोधित करत होते.

न्यायमूर्ती कौल म्हणाले, “मध्यस्थीची व्याप्ती विस्तृत होईल. संख्या आणि प्राधान्य या दोन्ही दृष्टीने विवाद सोडवण्याची ही पहिली पायरी असेल अशी अपेक्षा आहे.” जर न्यायालयाबाहेर तोडगा काढला गेला तर काम संपेल अशी वकिलांना चिंता आहे. ही चिंता दूर करताना असं केल्याने वकिलांचं काम संपत नाही, असं न्यायमुर्ती कौल म्हणाले. पुढे त्यांनी बोलताना कोविड-१९ ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर खटल्यांचा सामना करणं एक आव्हानात्मक असणार आहे, असं म्हटलं. आर्थिक दृष्टिकोनातून लोक खटल्यापेक्षा मध्यस्थीला प्राधान्य देतील, असं देखील ते म्हणाले. प्रस्तावित केंद्रीकृत कायदा मध्यस्थीला अधिक व्यापक पद्धत बनवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

 

 

- Advertisement -