घरदेश-विदेशदोन कोटींची नुकसान भरपाई; सर्वोच्च न्यायालयाने मॉडेलला बजावली नोटीस

दोन कोटींची नुकसान भरपाई; सर्वोच्च न्यायालयाने मॉडेलला बजावली नोटीस

Subscribe

 

नवी दिल्लीः चुकीचे केस कापले म्हणून राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मॉडल आशना रॉयला दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिल्लीतील हॉटेलला दिले होते. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. तसेच मॉडल आशनालाही न्यायालयाने नोटीस जारी केली आहे.

- Advertisement -

याआधीही हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये यावर सुनावणी झाली होती. चुकीचे केस कापणे व केसांवरील चुकीच्या उपचारासाठी दोषी धरत राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलला तक्रारदार मॉडेल आशनला दोन कोटी रुपये नुकसानभरपाई करण्याचे आदेश दिले होते. हे आदेश न्यायालयाने रद्द केले होते. आयोगाने नव्याने याबाबत निर्णय द्यावा, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिले होते.

त्यानुसार ग्राहक आयोगाकडे एप्रिल २०२३ मध्ये नव्याने सुनावणी झाली. आयोगाने जुनेच आदेश कायम ठेवले. त्याविरोधात हॉटेलने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्या. अनिरुद्ध बोस व न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने ग्राहक आयोगाच्या आदेशाला स्थगित देत मॉडेलला नोटीस जारी केली.

- Advertisement -

ही घटना २०१८ मध्ये घटना घडली. तक्रारदार आशना १२ एप्रिल २०१८ रोजी आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये केस कापण्यासाठी गेल्या होत्या. रॉय ह्या नेहमी ज्यांच्याकडून केस कापून घेत होत्या त्या त्यावेळी तेथे नव्हत्या. त्यामुळे त्या दुसऱ्या कोणाकडून केस कापून घेण्यास तयार नव्हत्या. मात्र त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर त्या दुसऱ्याकडून केस कापून घेण्यास तयार झाल्या. केस कसे कापावेत याची सूचना त्यांनी दिली.

केस कापतानी रॉय यांना मान खाली करुन ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे केस कसे कापले जात होते याचा त्यांना अंदाज आला नाही. केस कापून पूर्ण झाल्यानंतर त्यांना धक्का बसला. त्यांनी सुचना केल्याप्रमाणे केस कापलेले नव्हते. त्यांनी याची तक्रार सलोन व्यवस्थापकाकडे केली. त्यानंतर ३ मे २०२८ रोजी रॉय पुन्हा त्याच सलोनमध्ये केसांवर उपचार करण्यासाठी गेल्या. त्यावेळी उत्तम सेवेची हमी त्यांना देण्यात आली. या उपचारामुळे केसांचे नुकसान झाले.

रॉय यांनी याची तक्रार हॉटेल व्यवस्थापनाकडे केली. हॉटेल व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर रॉय यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे याची तक्रार केली. हॉटेलमध्ये केस कापल्याने व केसांवर उपचार केल्याने मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे हॉटेलने जाहिर माफी मागावी व तीन कोटी रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रॉय यांनी आयोगाकडे केली. त्याची दखल घेत आयोगाने मॉडलला दोन कोटी रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -