SC on Board Exam : ऑफलाईन बोर्ड परीक्षा न घेण्याची मागणी याचिका सर्वोच्च न्यायालयात रद्द

SC on Board Exam 2022 supreme court hearing today on plea demanding cancellation of board exams

Sc on Board Exam 2022 : सीबीएसई (CBSE), सीआयएससीई (CISCE), एनआयओएस (NIOS) आणि विविध राज्यांनी इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेऊ नयेत अशी विनंती करणारी याचिका दाखल केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने आज ही याचिका फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएएम खानविलकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले की, अशी याचिका दिशाभूल करणारी आहे आणि विद्यार्थ्यांना खोटी आशा देणारी आहे.

दहावी आणि बारावीच्या ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज ( २३ फेब्रुवारी २०२२) दुपारी २ वाजता सुनावणी झाली. न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी याचिका दाखल करणार्‍या अनुभा सहाय श्रीवास्तव यांनी युक्तिवाद केला की, कोरोनामुळे विद्यार्थी शारीरिक दृष्या वर्ग हजर होऊ शकले नाहीत, त्यामुळे बोर्डाची परीक्षा ऑनलाइन झाली पाहिजे. दरम्यान या याचिकेत सर्व बोर्डांना वेळेवर निकाल जाहीर करण्याची आणि विविध आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना सुधारित परीक्षेचा पर्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

यापूर्वी केंद्रीय बोर्ड म्हणजे CBSE, CISCE, NIOS आणि विविध राज्यांमधील संबंधित बोर्डांच्या 2021-22 च्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांच्या ऑफलाइन पद्धतीवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर 22 फेब्रुवारी 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे आदेश दिले होते.

यापूर्वी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या मुद्द्यावर न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणीसाठी हजर करण्याचा आदेश २21 फेब्रुवारी 2022 रोजी दिला होता. 21 फेब्रुवारी 2022 रोजीच हा आदेश देण्यात आला होता.

देशभरातील १५ राज्यांतील विद्यार्थ्यांद्वारे अधिवक्ता अनुभा सहाय श्रीवास्तव यांच्यामार्फत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याचे आदेश केंद्रीय मंडळांना तसेच राज्य मंडळांना परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेऊ नका, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा संपूर्ण वर्षात ऑनलाइन पद्धतीने वर्ग घेण्यात आले होते, त्यामुळे परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेऊ नयेत. तसेच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेताना निकाल वेळेत जाहीर करावा.


गुजरातमध्ये ६ हजार कोटींचा कोळसा घोटाळा झाल्याचा आरोप, काँग्रेसकडून चौकशीची मागणी