घरताज्या घडामोडीNDA परीक्षा आता मुलींनाही देता येणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

NDA परीक्षा आता मुलींनाही देता येणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Subscribe

देशाच्या सुरक्षेसाठी सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलासादायक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुलींसाठी राष्ट्रीय संरक्षण ॲकॅडमी (NDA) मध्ये प्रवेशासाठी परीक्षेत बसण्याचा आदेश दिला आहे. ५ सप्टेंबरला एनडीएची परीक्षा होणार आहे. प्रवेश प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन असणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान महिलांना संधी देण्यास विरोध केल्याबद्दल लष्कराला फटकारले आहे. लष्कराने आपली भूमिका बदलावी, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.

- Advertisement -

आज न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने कुश कालरा यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेत अंतरिम आदेश मंजूर केला. ज्यामध्ये महिला उमेदवारांना एनडीए परीक्षेत बसण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती.

याचिकेत म्हटले होते की, महिलांना फक्त लिंगाच्या आधारावर एनडीएमध्ये सामिल केले जाऊ शकत नाही. हे समानतेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. त्यामुळे योग्य महिला उमेदवारांना ‘राष्ट्रीय संरक्षण अॅकॅडमी’ आणि ‘नौदल अॅकॅडमी परीक्षा’मध्ये बसण्याची आणि प्रशिक्षण देण्याची परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली होती. हिच मागणी सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण केली आहे. आता मुलींनाही एनडीएची प्रवेश परीक्षा देता येणार आहे आणि सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अफगाणिस्तानने वाढवली चिंता, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -