Homeक्राइमSC angry : भाषणबाजी करायला हे आझाद मैदान नाही, संतप्त सुप्रीम कोर्टाने...

SC angry : भाषणबाजी करायला हे आझाद मैदान नाही, संतप्त सुप्रीम कोर्टाने सुनावले

Subscribe

ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वरिष्ठ वकिलाचा दर्जा देण्यात आला आहे, अशा किती न्यायाधीशांची नावे तुम्ही सांगू शकता, असा प्रश्न न्यायालयाने केला. यावर मी माझ्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ एक तक्ता सादर केला असल्याचे याचिकाकर्त्या वकिलाने सांगितले.

(SC angry) नवी दिल्ली : न्यायाधीशांच्या नातेवाईकांनाच न्यायालयांमध्ये ज्येष्ठ वकिलांचा दर्जा दिला जातो, असा दावा करणाऱ्या एका वकिलाला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. हा दावा करण्याबरोबरच किती न्यायाधीशांच्या नातेवाइकांना ज्येष्ठ वकील बनवले आहे हेही सांगावे, असे न्यायालयाने वकिलाला सुनावले. भाषणबाजी करायला हे मुंबईतील आझाद मैदान नाही. कायद्यानुसार चालणारे हे न्यायालय आहे, अशा शब्दांता न्यायालयाने वकिलाला फटकारले. (Supreme Court angry on the issue of senior lawyers in Delhi HC)

दिल्ली न्यायालयात 70 वकिलांना ‘वरिष्ठ वकीला’चा दर्जा देण्यात आला आहे. त्याविरोधात वकील मॅथ्यूज जे. नेंदुमपारा आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. हा ‘वरिष्ठ वकिला’च्या दर्जाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्याबरोबरच न्यायाधीशांच्या नातेवाइकांनाच ज्येष्ठ वकिलाचा दर्जा दिल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Adani Bribery Case : अदानी लाचप्रकरणात नवे अपडेट, अमेरिकेच्या कोर्टाने घेतला हा निर्णय

ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना वरिष्ठ वकिलाचा दर्जा देण्यात आला आहे, अशा किती न्यायाधीशांची नावे तुम्ही सांगू शकता, असा प्रश्न न्यायालयाने केला. यावर मी माझ्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ एक तक्ता सादर केला असल्याचे याचिकाकर्त्या वकिलाने सांगितले. मात्र, वकिलांच्या दाव्याशी न्यायालयाने असहमती दर्शवत, या बाबी याचिकेतून काढून टाकल्या नाहीत, तर कारवाईही केली जाईल, असा इशारा दिला. याचिकेत सुधारणा करण्याची सूट आम्ही तुम्हाला देतो. तुम्ही हे केले नाहीत तर आम्ही कारवाई देखील करू शकतो, असे न्यायालयाने सुनावले. त्यावर, बार असोसिएशन न्यायाधीशांना घाबरते, असे वकिलाने सांगताच, खंडपीठाने त्याला तीव्र आक्षेप घेतला.

- Advertisement -

वकिलाने केलेल्या युक्तिवादाबाबत कठोर टिप्पणी करताना न्यायमूर्ती गवई म्हणाले की, हे कायद्यानुसार चालणारे न्यायालय आहे. मुंबईतील आझाद मैदान नाही, जिथे तुम्ही कोणतेही भाषण करू शकता. येथे तुम्ही कायदेशीर आधारावर युक्तिवाद करा, भाषणबाजी नको, असे सुनावल्यानंतर न्यायालयाने वकिलाला आपल्या याचिकेत सुधारणा करण्यासाठी मुदत दिली. एवढेच नाही तर, या याचिकेत याचिकाकर्ता म्हणून स्वाक्षरी करणारा वकीलही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी असल्याचे खंडपीठाने सांगितले. (SC angry: Supreme Court angry on the issue of senior lawyers in Delhi HC)

हेही वाचा – Kareena Kapoor : कुमार विश्वासांच्या टीकेवरून यूपीत रंगले राजकारण, सपा आणि भाजपा आमनेसामने

Manoj Joshi
Manoj Joshi
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -