घरदेश-विदेशफटाके बंदीच्या निर्णयाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

फटाके बंदीच्या निर्णयाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Subscribe

फटाक्यांवर बंदी घालण्याच्या कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये फटाके वाजवण्यावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दिवाळीत फटाके बंदी करण्याचा निर्णय अनेक राज्यांनी घेतला आहे. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने फटाके बंदी करण्याचा निर्णय दिला. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत फिर्यादींची मागणी फेटाळून लावली. तर “सण महत्त्वाचे आहेत, हे आम्ही समजू शकतो. पण सध्या आयुष्यच धोक्यात आहे. सध्या जीवन वाचवण्यापेक्षा मोठी मूल्ये कोणतीच असू शकत नाही” असे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी यावेळी म्हटले आहे.

- Advertisement -

कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश

तसेच, करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर फटाके विक्रीवरही बंदी घातली. एक जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोलकाता उच्च न्यायालयाने हा आदेश दिला. यासह कोलकाता उच्च न्यायालयाने काली पूजा, दिवाळी आणि छट पूजेच्यावेळी पश्चिम बंगालमध्ये सर्व प्रकारचे फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला.

मुंबईत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाचे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला यंदा कोरोना काळात इतर सणांप्रमाणेच, दिवाळीही साधेपणाने करण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यात फटाक्यांच्या वापरावर बंदी आहे. महाराष्ट्रातही काही शहरात फटाके वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून (NGT) फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. फटाके विकल्यास आणि उडवल्यासही दंड भरावा लागणार आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात या शहरात फटाके फोडण्यास मनाई

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील अनेक शहरांत हवेचा दर्जा खालावल्याची माहिती असून त्यापैकी अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर ही १७ प्रदूषित शहरे असल्याचे सांगण्यात आले आहे. तर येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांवरील बंदी कायम असणार आहे. फटाके विकल्यास २० हजार रुपये दंड, तर फटाके वाजवल्यास २००० रुपये दंड आकारण्यात येईल, असा आदेश देण्यात आला आहे.


मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -