नुपूर शर्माच्या अटकेला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

तिच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आले आहेत.

Former judges officials write open letter after top courts comments on Nupur Sharma

पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. १० ऑगस्टपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश देण्यात आले असून १० ऑगस्टलाच या प्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. तसेच, तिच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याचे आदेश केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आले आहेत. (SC relief for Nupur Sharma, gets interim protection from arrest till August 10)

हेही वाचा – नुपूर शर्माच्या हत्येसाठी पाकिस्तानातून घुसखोरी, राजस्थानात बीएसएफची मोठी कारवाई

अटकपूर्व जामिनासाठी नुपूर शर्मा हिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच, देशभरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे एकाच ठिकाणी वर्ग करावेत अशी मागणीही तिने केली होती. त्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालायने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीत नुपूर शर्माचे वकील मनिंदर सिंह यांनी म्हटलंय की नुपूर यांच्या जीवाला धोका आहे. नुपूर शर्माच्या हत्येविरोधात व्हायरल ऑडिओ क्लिप, सलमान चिश्तीचं वक्तव्य तसेच युपीतील एका नागरिकाने शीर कापण्याचे दिलेले आदेश या सर्वांची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. त्यामुळे तिच्या अटकेवर स्थगिती देण्यात आली असून पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

हेही वाचा – नुपूर शर्मा प्रकरणाचे बिहारमध्ये पडसाद; तरुणाला चाकूने भोकसले

काय आहे प्रकरण?

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका चॅनेलच्या कार्यक्रमात पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा पडसाद संपूर्ण देशभर पसरले. एवढेच नव्हे तर आखाती देशातही नुपूर शर्मासह संपूर्ण भारताविरोधात रोष व्यक्त केला गेला. नुपूर शर्मा यांच्याविरोधात वाढता रोष लक्षात घेता भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालायानेही नुपूर शर्मा यांना फटकारले होते. तुमच्यामुळे देशाची बदनामी झाली असून सर्वांसमोर देशाची माफी मागा असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं.