घरदेश-विदेशपालघर हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मागितला राज्य सरकारकडे अहवाल

पालघर हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मागितला राज्य सरकारकडे अहवाल

Subscribe

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात झालेल्या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी आता सुप्रीम कोर्टा राज्य सरकारकडे अहवाल मागितला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टा याचिका दाखल करण्यात आली असून ज्यामुध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा किंवा त्याची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. पालघरमधील साधूंच्या हत्येप्रकरणी पोलीस आणि महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून वकिल शंशाक शेखर झा आणि राशी बंसल यांनी यासंबंधीची याचिका दाखल केली आहे. यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी ताकदीचा वापर का गेला नाही. लॉकडाऊन असतानाही इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी कशी जमली, असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले आहेत.

याचिकाकर्त्यांनी केला प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित

दरम्यान, सुनावणीच्या वेळी याचिकाकर्ते कोर्टासमोर ही मागणी केली की, हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आले आहे. त्याचे प्रमुख एडीजी रँकचे अधिकारी असून ते राज्य सरकारच्या सेवेत आहेत. त्यामुळे निष्पक्ष कारवाई होईल का, यावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सुनावणी पार पडली असून न्यायाधीश अशोक भूषण आणि संजीव खन्ना यांनी राज्याकडे यासंबंधीचा अहवाल मागितला आहे. हा अहवाल ४ आठवड्यात येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होईल. यावर याचिकाकर्त्यांनी ४ आठवड्याचा कालावधी खुप जास्त असल्याचे सांगत तो कमी करण्याची मागणी कोर्टासमोर केली. मात्र न्यायाधीशांनी ही मागणी फेटाळून लावली.

- Advertisement -

हेही वाचा –

‘कोरोनाने जायचं तिकीट बुक केलेलं नाही, लॉकडाऊन वाढवून काय होणार? – राज ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -