घरदेश-विदेशहाथरस हत्याकांडात एससी/एसटी कोर्टाचा मोठा निर्णय, एक आरोपी दोषी तर तीन आरोपींची...

हाथरस हत्याकांडात एससी/एसटी कोर्टाचा मोठा निर्णय, एक आरोपी दोषी तर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता

Subscribe

नवी दिल्ली : हाथरस हत्याकांडमध्ये कोर्टाने मोठा निर्णय देताना मुख्य आरोपी संदीपला कलम ३०४ आणि एससी/एसटी कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आले, तर इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत थोड्याच वेळात निर्णय दिला जाणार आहे.

हाथरसच्या बहुचर्चित हत्याकांड प्रकरणात ९०० दिवसांनी मोठा निर्णय आला. चार पैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून एका आरोपीला दोषी ठरवण्यात आले असून थोड्याच वेळात निर्णय दिला जाणार आहे. मुलीच्या बाजूचे वकील महीपाल सिंह निमहोत्रा यांनी सांगितले की, १४ सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या हाथरस घटनेत एससी-एसटी कोर्टाने आरोपी संदीपला दोषी ठरवले आहे, तर लवकुश, रामू आणि रवी या तिघांना दोषमुक्त केले आहे.

- Advertisement -

आरोपी संदीपला आईपीसी कलम ३०४ एससी-एसटी कायद्याच्या अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्यावर गैरवर्तनाचा आरोप सिद्ध झाला आहे. याबाबत लवकरच कोर्टाकडून निर्णय दिला जाईल.

मुलीच्या बाजूचे वकील महीपाल सिंह निमहोत्रा यांनी सांगितले की, न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. सीबीआयने सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते.

- Advertisement -

अशी घडली घटना
हाथरसच्या चंदपा भागातील एका गावात १४ सप्टेंबर २०२० मध्ये अनुसूचित जातीच्या एक मुलीवर सामूहिक अत्याचार झाला. गावातील चार मुलांनी तिच्यावर अत्याचार केला आणि तिला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये २९ सप्टेंबर २०२० रोजी या मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलीच्या वक्तव्याच्या आधारे संदीप, रवी, रामू व लवकुश या चार आरोपींना अटक केली होती.
सीबीआयने या चारही आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश (एससी-एसटी कायदा) यांच्या न्यायालयात कलम 302, 376A, 376D आणि SC-ACT कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. याशिवाय सीबीआयने ६७ दिवस त्यांची चौकशी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -