घरदेश-विदेशSC : हा तर न्यायालयाचा अवमान, तामिळनाडूच्या राज्यपालांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

SC : हा तर न्यायालयाचा अवमान, तामिळनाडूच्या राज्यपालांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

Subscribe

नवी दिल्ली : दोषसिद्धीला स्थगिती देण्यात आलेल्या द्रमुकच्या नेत्याची मंत्रीपदी पुन्हा नियुक्ती करण्यास नकार दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांना फटकारले. राज्यपाल संविधानाचे पालन करत नसतील तर, सरकार काय करते? असा थेट प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला विचारला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : हम साथ चले तो जितेंगे…, पुण्यातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित

- Advertisement -

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील या त्रिसदस्यीय पीठात न्यायमूर्ती जे बी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश होता. द्रमुक नेते के. पोनमुडी यांची मंत्रीपदी नियुक्ती करण्यासाठी खंडपीठाने आता राज्यपालांना उद्यापर्यंत एक दिवसाची मुदत दिली आहे. आर एन रवी यांनी के पोनमुडी यांना राज्य मंत्रिमंडळात पुन्हा समाविष्ट करण्यास नकार दिल्यानंतर एम के स्टॅलिन सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांची ही कृती घटनात्मक नैतिकतेच्या विरोधात असल्याचे तामिळनाडू सरकारने म्हटले आहे.

- Advertisement -

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच तामिळनाडूचे उच्च शिक्षणमंत्री के. पोनमुडी यांना दोषी ठऱविले होते. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने त्यांची दोषसिद्धी तसेच कारावासाच्या शिक्षेला स्थगिती दिली. यानंतर, तामिळनाडू सरकारने पोनमुडी यांना पुन्हा मंत्रीपद देण्याची मागणी केली होती, परंतु राज्यपालांनी त्यास इन्कार करताना सांगितले की, त्यांची शिक्षा केवळ स्थगित करण्यात आली आहे.

हेही वाचा – SC: पतंजलीने मागितली बिनशर्त माफी; फसव्या जाहिराती पुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र

राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करत आहेत, असे सांगून सरन्यायाधीश म्हणाले की, ज्यांनी त्यांना हा सल्ला दिला आहे, तो योग्य नाही. व्यक्ती किंवा मंत्र्याबद्दल माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. परंतु आपल्याला घटनात्मक तरतुदींनुसार कार्य करावे लागेल. आम्हाला या व्यक्तीची नियुक्ती करायची आहे, असे मुख्यमंत्री सांगत असतील तर, संसदीय लोकशाहीचा भाग म्हणून राज्यपालांनी ते केले पाहिजे. ते औपचारिक स्वरुपात राज्यप्रमुख आहेत, असेही चंद्रचूड म्हणाले.

हेही वाचा – Ajit Pawar on Raj Thackeray : राज ठाकरे युतीत येणार असतील तर…, काय म्हणाले अजित पवार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -