घरदेश-विदेशHemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का, याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का, याचिकेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Subscribe

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का बसला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालायत याचिका दाखल केली होती. हेमंत सोरेन यांनी शुक्रवारी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालायाने पहिला प्रश्न विचारला की, तुम्ही आधी उच्च न्यायालयात का गेला नाही? न्यायालय सर्वांसाठी खुले आहे. या मुद्द्यावर सुनावणी देण्यास उच्च न्यायालयही सक्षम आहे.

तुमच्या याचिकेवर थेट सुनावणी झाली तर सर्वांची थेट सुनावणी आम्हाला करावी लागेल, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालय सर्वांसाठी समान आहे. हेमंत सोरेन यांची बाजू मांडताना कपिल सिब्बल म्हणाले की, हा मुख्यमंत्र्यांशी संबंधित विषय आहे. उच्च न्यायालयातून आम्ही आमची याचिका मागे घेतली.

- Advertisement -

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हेमंत सोरेन यांना सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. उच्च न्यायालय देखील एक घटनात्मक न्यायालय आहे. या प्रकरणाची थेट सुनावणी होऊ शकत नाही. अन्यथा सर्वजण थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येतील.

काय आहे नेमकं प्रकरण?

- Advertisement -

ईडी हेमंत सोरेन यांची चौकशी रांचीमधील बडगई भागातील लष्‍कराच्‍या मालकीच्‍या 4.55 एकर जमिनीच्‍या खरेदी-विक्रीशी संबंधित आहे. या प्रकरणी महसूल उपनिरीक्षक भानू प्रताप यांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने सोरेन यांना 14 ऑगस्ट 2023 रोजी पहिले समन्स जारी केले होते. यानंतर सोरेन यांना सात समन्स बजावले होते पण ते तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. अखेर 20 जानेवारीला आठव्‍या समन्सनंतर त्यांनी आपले म्हणणे नोंदवले. या प्रकरणी आतापर्यंत 14 जणांना अटक झाली आहे. यामध्‍ये 2011 बॅचचे आयएएस अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -