Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश घोटाळेबाज फरार ललित मोदीची प्रसिद्ध वकील हरिश साळवेंच्या लग्नाला उपस्थिती

घोटाळेबाज फरार ललित मोदीची प्रसिद्ध वकील हरिश साळवेंच्या लग्नाला उपस्थिती

Subscribe

नुकतेच शिंदे गटाच्या बाजूने युक्तीवाद करणारे आणि देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. साळवे यांचे हे तिसरे लग्न असल्याने ते सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहे. परंतु त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आल्याने आता खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली : नुकतेच शिंदे गटाच्या बाजूने युक्तीवाद करणारे आणि देशाचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांनी तिसऱ्यांदा संसार थाटला आहे. साळवे यांनी त्रिना यांच्यासोबत थाटामाटात लग्न केले आहे. त्रिना ही मुळची ब्रिटनची नागरिक असून साळवेंच्या या तिसऱ्या लग्नामध्ये नीता अंबानी यांच्यासह अनेक मोठे लोक उपस्थित होते. रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. साळवे यांचे हे तिसरे लग्न असल्याने ते सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहे. परंतु त्यांच्या लग्नातील एक व्हिडीओ समोर आल्याने आता खळबळ उडाली आहे. कारण या लग्नाला कर चुकवल्यामुळे भारतातून पळून गेलेल्या ललित मोदी याने हजेरी लावली होती. भारतातून फरार असलेल्या व्यक्तीला कोणाकडून वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. हरिश साळवेंच्या लग्नामध्ये ललित मोदी चिअर्स करताना दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Scam fugitive Lalit Modi presence at the wedding of famous lawyer Harish Salve)

हेही वाचा – WHO Alert : भारतात विकली जात आहेत लिव्हरची बनावट औषधं; नावं तपासून घेण्याचा सूचना

- Advertisement -

देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांचे याआधी दोन लग्न झालेले आहेत. परंतु आता त्यांचे तिसरे लग्न झाल्याने या मुद्द्यावरून देखील विरोधकांकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. परंतु, या लग्नाला फरार घोटाळेबाज ललित मोदी याने हजेरी लावल्याने आणखी एका वादाला सुरुवात झाली आहे. हरिश साळवे यांच्या तिसऱ्या लग्नाला मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी, स्टील टायकून, लक्ष्मी मित्तल आणि मॉडेल उज्ज्वला राऊत या मोठ्या लोकांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी ईडीने फरार घोषित केलेल्या ललित मोदी सुद्धा साळवेंच्या लग्नात उपस्थित होता. करचोरी आणि मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू असतानाच ललित मोदी विदेशात फरार झाला होता. त्यामुळे आता ललित मोदी भारताच्या माजी सॉलिसिटर जनरलच्या तिसऱ्या लग्नामध्ये कशासाठी आला?, ललित मोदी आणि हरिश साळवे यांचे काय संबंध आहे?, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाले आहेत.

मागील आठवड्यात प्रसिद्ध वकील हरिश साळवे यांची ‘वन नेशन वन इलेक्शन’ या उच्चस्तरीय समितीवर नियुक्ती करण्यात आली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या समितीचे अध्यक्ष आहे. त्यामुळे आता साळवेंच्या लग्नात ललित मोदीने हजेरी लावल्याने मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. ‘ललित आणि नीरव मोदीला चोर म्हटल्यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती, हरिश साळवेंनी मोदीचा बचाव केला. आता ललित मोदी हरिश साळवे यांच्यासोबत काय करतोय?, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -