हिमाचलमध्ये बस दरीत कोसळून १६ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश

जंगला नावाच्या वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट दरीत जाऊन कोसळली. बस अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे दोन पथक अपघात स्थळी दाखल झाल्याची माहिती कुल्लूचे एसपी गुरुदेव शर्मा यांनी दिली.

हिमाचल प्रदेश येथील कुल्लू येथील सैज दरीत आज सकाळीच एक बस कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. (School children among several dead in Kullu bus accident)

सैंज घाटीतून शैंशर शहराकडे एक खासगी बस जात होती. या बसमध्ये स्थानिक प्रवाशांसह शालेय विद्यार्थी होते. जवळपास ४५ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. दरम्यान, जंगला नावाच्या वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस थेट दरीत जाऊन कोसळली. बस अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे दोन पथक अपघातस्थळी दाखल झाल्याची माहिती कुल्लूचे एसपी गुरुदेव शर्मा यांनी दिली.

हेही वाचा – RJD प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

बस ज्या दरीत कोसळली ते ठिकाण अत्यंत दुर्गम क्षेत्र आहे. त्यामुळे बस दरीत कोसळल्याने बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या भीषण अपघाताची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे. त्यांनी ट्विट करत या दुःखद प्रसंगी मी तुमच्यासोबत आहे, असं मोदी म्हणाले. तसेच, या अपघातात जीव गमावणाऱ्या प्रवाशांसाठी पंतप्रधानांनी २ लाखांची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तर, जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

हेही वाचा – डेन्मार्क येथील गोळीबारात तिघांचा मृत्यू, आरोपीला अकराव्या मिनिटालाच अटक

काय आहे मोदींचं ट्विट

या दुखःदप्रसंगी मी तुमच्यासोबत आहे. जे या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत. ते लवकरच पूर्ण बरे होतीस, अशी मी आशा व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन जखमी झालेल्या प्रवाशांची मदत करत आहेत.