Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश धक्कादायक: फी वसुल करण्यासाठी संचालकाची दमदाटी, बंदूक रोखून जीवे मारण्याची दिली धमकी

धक्कादायक: फी वसुल करण्यासाठी संचालकाची दमदाटी, बंदूक रोखून जीवे मारण्याची दिली धमकी

पालकांवर पिस्तुल रोखून शाळेची फी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणुने गेल्या वर्षभरापासून देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग पसरायला सुरु झाल्यानंतर मागील वर्षांपासून देशातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा बंद ठेवल्याने देशातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. काही महिन्यांनी शासनाने ऑनलाईन शिकवणी सुरु केली. सर्व शाळांना ऑनलाईन शिकवणी सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन आणि इंटरनेटचे अडथळे आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. शाळा सुरु नसल्या तरी काही शाळा प्रशासनाने पालकांकडून फी वसुलीचा तगदा लावला आहे. पालकांवर पिस्तुल रोखून शाळेची फी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शाळा प्रशासनाकडून फी वसूली केली जात असल्याच्या अनेक पालकांनी तक्रारी आतापर्यंत केल्या आहेत. परंतु उत्तर प्रदेशातील जबलपूर येथे फी वसूली करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका खाजगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावून घेतले. त्यांच्याकडे फी वसूल करण्यासाठी धमकावले यानंतर या पीडित पालकांनी शाळेच्या संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील जबलपूरमधील जॉय सीनियर सेकंडरी स्कुलच्या संचलकांनी शाळेतील विद्यार्थ्याच्या पालकाला शाळेत बोलावले होते. पालकाला एका बंद खोलीत बोलावल्यानंतर संचालकांनी गार्डला गोळी मारण्याचे आदेश दिले. तसेच पालकांना शिवीगाळ करत फी भरण्यास सांगितले. पालकांनी संबंधित संचालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. परंतु संचालकांना पोलिसांनी अद्याप अटक केले नाही.

- Advertisement -