तामिळनाडू : ‘त्या’ मुलीच्या आत्महत्येप्रकरणी शाळेच्या अधिकाऱ्यांना १५ दिवसांची कोठडी

१७ वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी आणि शाळेच्या वसतिगृहात सुरक्षितता राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण CBCID कडे सोपवण्यात आले आहे.

तामिळनाडू मधील कल्लाकुरिची येथे बारावीत शिकणाऱ्या मुलीच्या मृत्यूच्या निषेधार्थ रविवारी मोठा हिंसाचार घडला आहे. मुलीच्या मृत्यूबद्दल न्याय मागताना आंदोलकांनी शाळेत घुसून, बसेस जाळल्या, शाळेच्या मालमत्तेची तोडफोड केली तसेच पोलिसांच्या देखील गाड्या जाळल्या. त्यावेळी सर्व आंदोलकांवर कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शक्ती मॅट्रिक्युलेशन या शाळेचे सचिव, मुख्याध्यापक, शाळेचा प्रतिनिधी आणि दोन शिक्षकांना १५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. (School Secretary Principal correspondent 2 teachers sent to 15 day remand for death of school girl in Kallakurichi)

शक्ती मॅट्रिक्युलेशन शाळेचे प्रतिनिधी रविकुमार, सचिव शांती आणि मुख्याध्यापक शिव शंकरन अशी १५ दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेल्या शाळेतील अधिकाऱ्यांती नावे आहेत. तसेच, त्यांना १७ वर्षीय मुलीच्या मृत्यूप्रकरणी आणि शाळेच्या वसतिगृहात सुरक्षितता राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण CBCID कडे सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी मॅट्रिक संचालनालयाने ९८७ खाजगी शाळांना नोटीस पाठवून सरकारच्या सल्ल्याविरुद्ध शाळा बंद केल्याबद्दल त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

तामिळनाडूतील चिन्ना सालेमजवळील कानियामूर येथील शाळेत रविवारी सुमारे २ हजार लोक जमले होते. त्यावेळी त्यांनी दगडफेकी केली होती. यामध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले होते. शिवाय, शाळेबाहेर जमलेल्या आंदोलकांनी पोलिसांच्या तीन वाहनांसह १५ स्कुल बस जाळल्या. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्मा झाले होते.

दरम्यान, या मुलीने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये शाळेतील शिक्षकांनी छळ केल्याचा आरोप केला आहे. या मुलीला न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले होते.

या घटनेचा तपास केला असता, तामिळनाडूचे डीजीपी सी सिलेंद्र बाबू यांनी त्या मुलीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचे सांगितले होते. तसेच, याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह पुन्हा पोस्टमार्टमसाठी पाठवावा यासाठी पालकांनी हायकोर्टात धाव घेतली.


हेही वाचा – महागाईच्या मुद्द्यावरून गाजणार संसदेच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस; काँग्रेस आंदोलनाच्या तयारीत