घरताज्या घडामोडीशाळा सुरू करण्याच्या गाइडलाइन्स तयार, १ सप्टेंबरपासून शाळा सुरू?

शाळा सुरू करण्याच्या गाइडलाइन्स तयार, १ सप्टेंबरपासून शाळा सुरू?

Subscribe

देशात आता अनलॉक ४ ची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मॉल खुले करण्यास परवानगी देण्यात आली आहेत. तरी अनेक प्रतिबंध लावण्यात आले आहेत. पण गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा बंद आहेत.

केंद्राची गाइडलाइन्स तयार

केंद्र सरकारने यासाठी गाइडलाइन्स तयार केल्या आहेत. यावर सचिवांची टीम आणि आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी यांनी चर्चा केली आहे. अस म्हटलं जात आहे की, अंतिम अनलॉक गाइडलाइन्सदरम्यान याबाबत माहिती दिली आहे. काही राज्यांमध्ये माध्यमिक शाळा सुरू करण्याची योजना तयारी करीत आहेत. मात्र अद्याप राज्य सरकारांना या योजनेबाबत मुलांच्या पालकांचं समर्थन मिळत नाही. बैठकीचा भाग असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या कमी आहे. त्यांनी सीनिअर वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

- Advertisement -

५ सप्टेंबरपासून शाळा सुरू होणार?

आंध्रप्रदेशासह राज्यात १ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा विचार सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या गाईडलाइन्समध्ये शाळा सुरू करण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारवर सोडला आहे. आंध्र सरकारने शाळा सुरू करणाच्या बातमीवर अनेक पालकांनी विरोध केला आहे.

या राज्यात सुरू होऊ शकतात शाळा

उत्तर पुर्वेकडील राज्य मणिपूर, मिजोराम,नागालॅँड,कोरोनाची रूग्णांची संख्या कमी आहे. अशात ही राज्य शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. विशेष बाब म्हणजे या राज्यात कोरोनाची रूग्णसंख्या नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत नव्या गाइडलाइन्सअंतर्गत येथे शाळा सुरू करण्यात येऊ शकतात. याशिवाय ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, तेथे शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Breast Milk पासून तयार होणार आईस क्यूब, कोरोना रूग्णांसाठी ठरणार फायदेशीर!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -