ज्या शाळेत महिला शिक्षिका असतात तिथे भांडणच जास्त होतात… शिक्षण मंत्र्यांचे अजब विधान

School with more women staffers sees more squabbles, Rajasthan Education Minister Dotasra
ज्या शाळेत महिला शिक्षिका असतात तिथे भांडणच जास्त होतात... शिक्षण मंत्र्यांचे अजब विधान

राजस्थानचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांचे आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्ताने केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. गोविंद सिंह डोटासरा बोलता-बोलता म्हणाले की, ‘ज्या शाळेत महिला शिक्षिका जास्त असतात तिथे जास्त भांडण होतात.’ यावेळेस डोटासरा शिक्षकांना संबोधित करत होते आणि सांगत होते की, ‘महिलांना सर्व ठिकाणी प्राधान्य दिले आहे आणि थोड्या अधिक प्रयत्नांनी महिला खूप पुढे येऊ शकतात.’

आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त गोविंद सिंह डोटासरा म्हणाले की, ‘आमच्याकडे अनेक लोकं येतात आणि सांगितात की, शहराजवळ आमची ड्यूटी लावा. आम्ही सांगतो जागा नाही आहे. मग ते म्हणतात जागा कशी असेल, सर्व महिलांना शहराजवळ जागा देण्यात आली आहे.’

पुढे गोविंद सिंह डोटासरा म्हणाले की, ‘महिलांना प्रथम अशी सरकारने योजना केली आहे. आम्ही निवड आणि प्रमोशनमध्ये महिलांना प्राधान्य दिले आहे. काही लोकांना हे चांगले वाटत नाही आहे. ते विचारतात की, आम्ही चांगले शिकवू शकत नाही का? परंतु एक गोष्टी तुमच्या लोकांना सांगू इच्छितो. तुमच्याकडे महिला शिक्षकांची भांडणं खूप आहेत. ज्या शाळेत महिला स्टाफ असतात तिथे भांडणं होतात. जर एखादी महिला शिक्षिका छोट्या छोट्या गोष्टी दुरुस्त करू शकतात, तर ती नेहमी पुरुषांपेक्षा पुढे असेल.’


हेही वाचा – पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटात पत्रकाराचा मृत्यू, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली जबाबदारी