घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: कोरोनावर औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना हवंय 'आईचं दूध'

Coronavirus: कोरोनावर औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना हवंय ‘आईचं दूध’

Subscribe

कोरोना व्हायरसवर लस किंवा औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. यातच आता न्यूयॉर्कमधील वैद्यकीय संशोधक रिबेका पॉवेल यांनी स्तनदा मातांना एक आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसवर प्रभावी औषध शोधण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या स्तनदा मातांनी त्यांचे दूध संशोधनासाठी द्यावे अशा आशयाची फेसबुक पोस्ट त्यांनी प्रसिद्ध केली आहे. रोगप्रतिकारशक्ती शास्त्रज्ञ असलेल्या रिबेका यांनी न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या महिलांसाठी हे आवाहन केले आहे.

रिबेका यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तुम्ही निरोगी स्तनदा माता आहात? तुमच्या बाळासाठी अतिरिक्त असलेले दूध देण्यासाठी तुम्ही तयार आहात का?” असे प्रश्न त्यांनी फेसबुकवर विचारले आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. त्यानंतर रिबेका यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “न्यूयॉर्क मधील अनेक स्तनदा माता आम्हाला दूध देण्यासाठी तयार झाल्या आहेत. आमच्या ईमेलवर शंभरहून अधिक अर्ज आले आहेत. अनेक स्तनदा मातांना त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची शंका येत आहे.”

- Advertisement -

I have always felt Mothers milk had the edge on protection for our children. I will post the link for the email to share…

New England Mothers First – NEMF ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 5, 2020

 

- Advertisement -

आईच्या दूधावर संशोधन कशासाठी? असा प्रश्न विचारला असता, रिबेका म्हणाल्या की, आईच्या दूधात अनेक आजारांविरोधात लढण्याची क्षमता असते, प्रोटिन आणि अँटीबॉडिजने हे दूध युक्त असते. आईचे दूध बाळाला संसर्गजन्य आजार आणि कांजण्यासारख्या आजारांपासून दूर ठेवते. त्यामुळेच आम्ही नवमातांना त्यांचे दूध संशोधनासाठी देण्याचे आवाहन करत आहोत. रिबेका यांना विश्वास आहे की, या दूधाच्या माध्यमातून शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसवर उपचार करण्यासाठी प्रभावी औषध शोधू शकतील.

रिबेका पॉवेल यांचा आईच्या दूधावर दांडगा विश्वास असला तरी अद्याप इतर शास्त्रज्ञांनी यावर शिक्कामोर्तब केलेले नाही. नवजात बालकांसाठी आईचे दूध निश्चितच फायदेशीर असते. दूधाच्या माध्यमातून आई आपल्या मुलाला आजारांविरोधात लढण्याची शक्ती देत असते. मात्र हे दूध बाळा व्यतिरीक्त इतर व्यक्तींच्या शरिरातील व्हायरसवर प्रभावी ठरू शकते का? यावर निश्चित असे संशोधन झालेले नाही. मात्र रिबेका यांना त्यावर विश्वास आहे.

रिबेका यांची टीम न्यूयॉर्कमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या स्तनदा मातांकडून दूध गोळा करण्याचे काम करत आहे. त्यानंतर या दूधातील अँडिबॉडिज कोरोना विषाणूला मारतात की नाही? हे तपासले जाणार आहे. जर रिबेका यांच्या मतानुसार दूधातील अँटिबॉडिज विषाणूवर विजय प्राप्त करत असेल तर या दूधातील रोगप्रतिकारशक्ती कोरोनाच्या रुग्णांना देण्याचा विचार केला जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -