घरदेश-विदेशप्राण्यांच्या या २६ प्रजातींना कोरोनाचा धोका जास्त ?

प्राण्यांच्या या २६ प्रजातींना कोरोनाचा धोका जास्त ?

Subscribe

घरगुती प्राण्यांचाही समावेश

सायंटिफिक जर्नलमधील अहवालातील अभ्यासानुसार जवळपास २६ प्राण्यांच्या प्रजातींना कोरोना व्हायरसचा धोका असल्याचे समोर आले आहे. प्राण्यांच्या ज्या प्रजाती या माणसांच्या संपर्कात असतात अशा प्रजातींना मोठा धोका असल्याचे समोर आले आहे. संशोधकांनी जवळपास २१५ प्राण्यांचा अभ्यास करून हे संशोधन मांडले आहे. कोरोना व्हायरसच्या म्युटेशननंतर प्राण्यांचे प्रामुख्याने निरीक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये प्राणी कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर स्थिर आहेत की नाही ही बाब तपासण्यात आली.

संशोधकांनी मांडलेल्या माहितीनुसार काही प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरस विरोधातली प्रतिकारशक्ती सर्वाधिक असते. अशा प्राण्यांमध्ये मेंढी, चिंपांजी, गोरिला यासारख्या प्राण्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनचा यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. संशोधकांनी या अभ्यासादरम्यान मांडलेल्या मतानुसार कोणते प्राणी कोरोना व्हायरसच्या इन्फेक्शनने बाधित होतात याचा अभ्यास करण्यात आला आहे. ज्या प्राण्यांना कोरोनाची लागण होईल त्यांचा समावेश हा धोकादायक प्रजातींमध्ये होणार आहे. या प्राण्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यास त्याचा परिणाम हा शेतकऱ्यांवरही होऊ शकतो. कोरोनाची वारंवार लागण होण्याचा धोका प्राण्यांपासून असल्याने याचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार बहुतांश पक्षी, मासे आणि सरपटणारे प्राणी यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी आहे. पण सस्तन प्राण्यांमध्ये कोरोनाची लागण होण्याचा संभाव्य धोका अधिक आहे. संशोधकांच्या अभ्यासानुसार घरगुती मांजरी, कुत्रा यासारख्या प्राण्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. आतापर्यंत सिंह आणि वाघ यांनाही कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -