घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोनाला रोखणाऱ्या अँटिबॉडीचा शोध

कोरोनाला रोखणाऱ्या अँटिबॉडीचा शोध

Subscribe

वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूला रोखणाऱ्या अँटीबॉडीचा शोध लावला आहे. 47D11 ही अँटीबॉडी कोरोनाला पसरण्यापासून रोखते.

कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या विषाणूला शरीरात पसरण्यापासून रोखतील अशा अँटीबॉडी वैज्ञानिकांनी शोधली आहे. आता शास्त्रज्ञांना आशा आहे की ते लवकरच उपचारासाठी अधिक चांगली लस तयार करू शकतील. हे अँटीबॉडीज कोरोना विषाणूशी चिकटतात आणि बाहेरील काटाचा थर तोडून ते निष्क्रिय करतात. या अँटीबॉडीचं नाव 47D11 आहे. या अँटीबॉडीच्या शोधामुळे शास्त्रज्ञांमध्ये अशी आशा आहे की ते आता शरीरातील कोरोना विषाणूला निष्क्रिय करतील. त्यामुळे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही. उंदरांवर त्याची चाचणी यशस्वी झाली आहे.

युरोपमधील वैज्ञानिकांनी उंदिरामध्ये आढळणाऱ्या ५१ सेल लायन्स पेशीमधून याचा शोध लावला आहे. त्यानंतर त्याचा प्रयोग मानवांवर करण्यात आला आहे. व्यक्तींवर प्रयोग करण्यासाठी जेनेटिकली इंजिनिअर करण्यात आलं आहे. त्यानंतर अँटिबॉडीची तपासणी करण्यासाठी त्यांनी २००३ मध्ये पसरलेला सार्स कोरोना विषाणूवर केली. २००३ साली सार्सला या अँटिबॉडीने निष्क्रीय करण्यात आलं होतं. कोविड-१९ हा सार्स कोरोना विषाणू पैकीच एक आहे, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. त्यामुळे ही अँटीबॉडी कोविड-१९ ला पण निष्क्रिय करेल, असा विश्वास वैज्ञानिकांना आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनावरून चीन-अमेरिका युद्ध होण्याची शक्यता


वैज्ञानिकांच्या या टीमचे नेतृत्त्व युट्रेच विद्यापीठाचे प्राध्यापक बेरेंड जेन बॉश करीत आहेत. प्रोफेसर बॉश यांच्या मते, या अँटीबॉडीमध्ये कोविड -१९ या कोरोना विषाणूचा नाश करण्याची क्षमता आहे. कारण हा विषाणूच्या पेशींवर चिकटून राहण्यासाठी विषाणूच्या थरांवर हल्ला करतो. प्रा. बॉश म्हणाले की अशा अँटीबॉडीजमुळे जरी मानवी शरीरात कोरोना विषाणूचा प्रसार थांबला नाही. तरीही, चांगली गोष्ट अशी आहे की या अँटीबॉडीमुळे, कोरोना विषाणूला मानवी शरीरात पसरण्यास जास्त वेळ लागेल. म्हणजेच कोविड -१९ विषाणू शरीरात कमकुवत होईल. वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत उंदराला कोरोना विषाणूचा संसर्ग केला. शास्त्रज्ञांनी पाहिले की लगेच विषाणू उंदीरच्या शरीरात शिरला, तसं ५१ प्रकारच्या अँटीबॉडीज उंदीरच्या शरीरातून बाहेर येऊ लागल्या. त्यात 47D11 अँटीबॉडी होती. जी कोरोना विषाणूची बाह्य थर नष्ट करत होती. हेच वैज्ञानिकांनी हेरलं आणि ही अँटीबॉडी ओळखली.

- Advertisement -

कोरोना विषाणू गोल आकारात आहे. त्याभोवती एस-2 नावाच्या प्रोटीनचा काटेरी थर आहे. ही काटेरी थर माणसाच्या शरीरातील पेशींना चिकटतात. पेशींमध्ये जीन्स सोडल्यानंतर, विषाणू पेशी खाऊन आपली संख्या वाढवायला सुरुवात करतो. म्हणूनच शास्त्रज्ञांनी अशी अँटीबॉडी शोधली आहे जी कोरोना विषाणूच्या बाह्य काटेरी थरावर चिकटून नष्ट करतात. म्हणजेच कोरोना विषाणूचे ते काटेरी थर नष्ट होतो, ज्याने तो हल्ला करतो.


हेही वाचा – प्रत्यार्पणाविरोधात मल्ल्याची युकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव


रीडिंग युनिव्हर्सिटीच्या सेल्युलर मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक डॉ. सिमोन क्लार्क म्हणाले की कोरोना विषाणू मानवी शरीरात प्रवेश करण्यापासून रोखला जाईल. म्हणजेच तो मानवी शरीरात काहीही करू शकणार नाही. प्रा. सिमोन म्हणाले की अँटीबॉडीज विषाणूवर हल्ला करतात आणि त्याला चिकटतात. यामुळे, एकतर हा विषाणू नष्ट होतो किंवा तो आपल्या शरीराच्या पेशींवर जितक्या सामर्थ्याने पाहिजे त्या प्रमाणात आक्रमण करू शकत नाही. तथापि, या अँटीबॉडीची क्लिनिकल चाचण्या अद्याप बाकी आहेत. त्यानंतरच या अँटीबॉडीचं भविष्य असणार आहे. परंतु आतापर्यंतच्या चाचण्या यशस्वी ठरल्या असून निकाल सकारात्मक लागला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -