घरदेश-विदेशपराठाप्रेमींच्या खिशाला कात्री, भरावा लागणार 18 टक्के जीएसटी

पराठाप्रेमींच्या खिशाला कात्री, भरावा लागणार 18 टक्के जीएसटी

Subscribe

अहमदाबादमधील वाडीलाल इंडस्ट्रीज या कंपनीने पराठ्यावरील जीएसटी कमी करण्याची याचिका कोर्टात दाखल केली होती. मात्र, वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनीचा हा दावा फेटाळत AAAR ने पराठ्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येईल असं सांगितलं.

जर तुम्हाला पराठा खायला आवडत असेल तर त्यावर तुम्हाला 18 टक्के जीएसटी मोजावा लागेल. तर चपातीवर 5 टक्के जीएसटी मोजावा लागेल. गुजरातमधील AAAR विभागाने पराठ्यांलवर 18 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या मते, चपाती आणि पराठ्यामध्ये खूर फरक आहे. पराठ्यामध्ये भाज्यांचा वापर केला जातो त्यामुळे त्याची किंमक चपातीच्या तुलनेत जास्त आकारण्यात येईल. अनेक खाद्य पदार्थांवर पाच टक्के जीएसटी आकारला जातो. मात्र, काही पदार्थांचा समावेळ विषेश श्रेणीत केला असून त्यांच्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येतो. त्यामुळे आता गुजरातमध्ये पराठ्यांवर 18 टक्के जीएसटी असणार आहे.

अहमदाबादमधील वाडीलाल इंडस्ट्रीज या कंपनीने पराठ्यावरील जीएसटी कमी करण्याची याचिका कोर्टात दाखल केली होती. ही कंपनी फ्रोजन पराठे तयार करतात आणि त्यांच्या मते चपाती आणि पराठ्यांमध्ये जास्त फरक नसतो. यांची बनवण्याची पद्धत देखील एकसारखीच असते. मात्र, वाडीलाल इंडस्ट्रीज कंपनीचा हा दावा फेटाळत AAAR ने पराठ्यावर 18 टक्के जीएसटी आकारण्यात येईल असं सांगितलं.

- Advertisement -

पराठ्यावरील जीएसटीमुळे सोशल मीडियावरही वाद सुरु

- Advertisement -

सध्या कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची आर्थिक परिस्थिती डगमगली आहे. भारतातील अनेक जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. पावसामुळे पिकांचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे सध्या गहू महागले आहेत. अशातच आता पराठ्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असल्याने सोशल मीडियावर युजर्स राग व्यक्त करत आहेत.

दूध आणि फ्लेवर्ड दूधामध्ये देखील हेच अंतर
पराठा आणि चपाती प्रमाणेच जीएसटी वरील वाद दूध आणि विविध फ्लेवर्ड दूधावरुन झाला होता. गुजरातमधील जीएसटी अधिकाऱ्यांनी फ्लेवर्ड दूधावर 12 टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. मात्र दूधावर कोणताही कर आकारला जात नाही.


हेही वाचा :

ऋतिकने पहिल्यांदाच शेअर केला सबासोबतचा फोटो; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -