घरदेश-विदेशSCO शिखर परिषदेच्या मंचावर दिसणार PM मोदी आणि पुतिन यांची मैत्री, जिनपिंग...

SCO शिखर परिषदेच्या मंचावर दिसणार PM मोदी आणि पुतिन यांची मैत्री, जिनपिंग यांच्याशी होणार का चर्चा?

Subscribe

नवी दिल्ली: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उझबेकिस्तानला रवाना होणार आहेत. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्जिओयेव यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये पीएम मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि इतर नेत्यांची भेट घेऊ शकतात अशी चर्चा आहे. तसेच 15 आणि 16 सप्टेंबरला समरकंदमध्ये ते SCO शिखर परिषद सहभागी होणार आहे. भारत, रशिया, चीन आणि पाकिस्तानसह 8 देशांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मात्र भारत आण चीन यांच्यातील एलओसीवरील तणाण असताना पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीबाबत सस्पेंस कायम आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

दरम्यान रशियाने शुक्रवारी पंतप्रधान मोदींसोबतच्या द्विपक्षीय बैठकीला दुजोरा दिला आहे. रशियाने सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यातील द्विपक्षीय बैठकीदरम्यान सामरिक स्थिरता, आशिया पॅसिफिक क्षेत्राची स्थिती आणि संयुक्त राष्ट्र, G20 आणि SCO सारख्या प्रमुख बहुपक्षीय स्वरूपातील सहकार्य यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. पीएम मोदी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटले की, या शिखर परिषदेला SCO सदस्य देशांचे नेते, निरीक्षक देश, SCO चे महासचिव, SCO प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचनेचे कार्यकारी संचालक उपस्थित राहणार आहेत. तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष आणि इतर नेकते देखील यावेळी उपस्थित राहतील. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान शिखर परिषदेच्या बाजूला काही द्विपक्षीय बैठकाही घेण्याची शक्यता आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांची भेट घेणार आहेत की नाही यासंदर्भात कोणतेही अधिकृत विधान नाही. या शिखर परिषदेदरम्यान नेत्यांनी गेल्या दोन दशकांतील संस्थेच्या कार्याचा आढावा घेणे आणि राज्य आणि भविष्यात बहुपक्षीय सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा करणे अपेक्षित आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -

2019 सालापासून SCO ची ही पहिली शिखर परिषद असेल, ज्यामध्ये नेत्यांची प्रत्यक्ष उपस्थिती असेल. जून 2019 मध्ये SCO परिषद बिश्केक, किर्गिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती. 2020 मधील मॉस्को शिखर परिषद कोविड-19 साथीच्या आजारामुळे ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती, तर दुशान्बे येथे 2021 शिखर परिषद “हायब्रिड” पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. SCO चे मुख्यालय बीजिंग येथे आहे, ज्यात चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे.


प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यापूर्वीही आपला देश धर्मनिरपेक्ष होता, हिजाब वादावर सुप्रीम कोर्टाची टिपण्णी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -