जागा 1 उमेदवार 35; गुजरातमध्ये काँग्रेसच्या जागेवर भाजपचा दावा, एवढे महत्त्व कशासाठी?

सध्या याच विधानसभा मतदारसंघात कांग्रेस पक्षाचा आमदार आहे. दरम्यान या आधी 2007 सालात याच मतदार संघात भाजपचा आमदार होता.

निवडणूक जवळ आली की प्रत्येक नेता आणि पक्ष जोमाने कामाला लागतात. अशातच गुजरात राज्यातही विधानसभा निवडणूका लवकर होणार आहेत. अशातच तिथे सुद्धा भाजपकडून जोमाने निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ग्राउंड लेव्हलला जाऊन तिकीट वाटपाच्या कामाचा सर्व्हे करण्यात येत आहे. गुजरातमधील विद्यमान आमदारांना तिकीट द्यायचे की दुसऱ्या उमेदवारांना संधी द्यायची यावरच गुजरातमधील प्रत्येक मतदारसंघाचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी निरीक्षकांना तीन दिवसांसाठी गुजरात मतदार संघात पाठविण्यात आले आहे. या सगळ्यात जी उमेदवार योग्य आणि उत्तम असेल त्यालाच संधी देण्यात येणार आहे. अशातच गुजरात मधील एका मतदार संघाने भाजपच्या नाकीनऊ आणले आहेत. (Seat 1 candidate 35; BJP’s claim on Congress seats in Gujarat, why is it so important?)

निवडणूक म्हटली की सर्वच गोष्टींचा विचार करावा लागतो. गुजरात मधील अरवल्ली जिल्यातील मोडासा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सध्या याच विधानसभा मतदारसंघात कांग्रेस पक्षाचा आमदार आहे. दरम्यान या आधी 2007 सालात याच मतदार संघात भाजपचा आमदार होता. पण त्या नंतरच्या विधानसभा निवडणुकीत म्हणेजच 2012 आणि 2017 मध्ये या विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते. राजेंद्र सिंह ठाकोर हे या विधानसभेत विद्यमान आमदार आहेत. दरम्यान या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या 35 उमेदवारांनी दावा केला आहे.

एवढे उमेदवार कशाकरता?

दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत केवळ 1640 मतांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. पण यावेळी मात्र आप सुद्धा मोडासा या विधानसभा मतदारसंघात स्वतःचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहे. त्यामुळे या मतदार संघात मतांचे विभाजन होणार हे निश्चित आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार हमखास निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळेच भाजपच्या 35 इच्छुक उमेदवारांनी अक्षरशः रीघ लावली आहे.

घाटलोडिया मतदारसंघातून भूपेंद्र पटेल यांच्याशिवाय कोणीही उमेदवारीसाठी दावा केलेला नाही. पटेल यांनी 2017 च्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय सुद्धा मिळविला होता. एकूण मतांच्या 72 टक्क्यांहून अधिक मते मिळाली होती. दरम्यान आप ने विजय पटेल यांना उमेदवारी दिली आहे.


हे ही वाचा – एअरबस प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाणार हे वर्षभरापूर्वीच ठरलेले; पण तरीही…- उदय सामंत