जेव्हा देवाचे तिकिट कम्फर्म होते

रेल्वेच्या इतिहासात देवासाठी पहिल्यांदाच कायम आरक्षित सीट

Mahakal express
महाकाल एक्सप्रेसमध्ये भोलेबाबासाठी तिकिट आरक्षित

सर्वसामान्यांना रेल्वेचे तत्काळ तिकिट मिळाले म्हणजे देव पावला असाच काही अनुभव असतो. पण नुकत्याच उद्घाटन झालेल्या काशी महाकाल एक्सप्रसेमध्ये बी ५ कोच आणि सीट नंबर ६४ ही कायमची आरक्षित सीट ठेवण्यात आली आहे तीदेखील चक्क देवासाठी.

Mahakal express
महाकाल एक्सप्रेसमध्ये भोलेबाबासाठी तिकिट आरक्षित

भोले बाबासाठी कायम आरक्षित अशी ही सीट असेल असा निर्णय भारतीय रेल्वेमार्फत घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच देवासाठी एखादी सीट आरक्षित करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे खुद्द रेल्वे प्रशासनानेही मान्य केले आहे. पण आगामी दिवसात ही सीट कायम ठेवायची का हा निर्णय़ही लवकरच होईल असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी उद्घाटन केलेल्या काशी महाकाल एक्सप्रेसच्या निमित्ताने भारतीय रेल्वेने एका नव्या गोष्टींचा पायंडा पाडला आहे. चक्क भगवान शंकरासाठीच एक सीट आरक्षित करण्याचा प्रकार या एक्सप्रेसमध्ये घडला आहे. कासी महाकाल एक्सप्रेस ही तीन ज्योर्तिंलिंगाला जोडणारी असा प्रवास घडवणार आहे. दोन राज्यांमधील तीन ज्योर्तिलिंगाचा यामध्ये समावेश आहे.

इंदोरनजीक ओंमकारेश्वर, उज्जैनचे महाकालेश्वर, वाराणसीतील काशी विश्वनाथ या ज्योर्तिलिंगाचा प्रवास या काशी महाकाल एक्सप्रेसच्या माध्यमातून शक्य होणार आहे. आयआरसीटीच्या माध्यमातून चालवण्यात येणारी अशी सार्वजनिक क्षेत्रातील ही तिसरी कॉर्पोरेट ट्रेन आहे.

mahakal express
देवासाठी विशेष जागा

महाकाल एक्सप्रेसची ही आहेत वैशिष्ट्ये

कमी आवाजातले संपुर्ण वेळ असे भक्तीमय संगीत, प्रत्येक कोचमध्ये खाजगी गार्ड, फक्त शाकाहारी जेवण आणि थर्ड एअऱ कंडीश्नर कोच ही काही वैशिष्ट्ये आहेत. वाराणसी आणि इंदोर दरम्यान आठवड्यातून तीन वेळा ही एक्सप्रेस धावणार आहे. वाराणसी आणि इंदौर दरम्यान व्हाया लखनौ असे ११३१ किलोमीटरचे अंतर तसेच वाराणसी आणि अलाहाबाद दरम्यानचे ११०२ किमी अंतर ही एक्सप्रेस १९ तासात कापेल असा अंदाज आहे.


हे ही वाचा – लाखोंना भोवली ओव्हर स्पिडींग