मेहुल चोक्सीला सेबीचा मोठा दणका; शेअर मार्केटमधील व्यवहारांवर 10 वर्षांसाठी बंदी

sebi debars mehul choksi from markets for 10 years

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने ( SEBI) भारतातील फरार उद्योगपती मेहुल चोक्सीला मोठा दणका दिला आहे. सेबीने सोमवारी एक आदेश जाहीर केला आहे. त्या आदेशानुसार मेहुल चोक्सीला सिक्युरिटी मार्केटमध्ये 10 वर्षांसाठी व्यापार करण्यास बंदी घातली आहे. यासोबत 5 कोटींचा दंडही ठोठावला आहे. चोक्सीला हा दंडाची रक्कम 45 दिवसांच्या आत जमा करावी लागणार आहे. असे सेबीने आपल्या आदेशात म्हटले आहे.

सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्सच्या फसवणुकीबाबत ही कारवाई केली आहे. चोक्सी हा गीतांजली जेम्सचा अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होता. तसेच समूहाच्या प्रवर्तकांपैकी एक होता.

नेमकं प्रकरण काय?

हे एक दशक जुनं आहे. जुलै 2011 ते जानेवारी 2012 दरम्यान सेबीने गीतांजली जेम्सच्या शेअर बाजारातील व्यवहाराबाबत तपास केला होता. ज्यात तो चुकीच्या व्यवहारात दोषी आढळला होता. ज्यानंतर चोक्सीला मे 2022 मध्ये कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

सेबीने आपल्या आदेशात म्हटले की, चोक्सीने 15 कंपन्यांना निधी दिला होता, ज्यांना फ्रंट एंटिटी म्हटले जाते. या कंपन्यांशी चोक्सीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंध होता. याच दरम्यान चोक्सीने 74.44 कोटी रुपये या कंपन्यांना हस्तांतरित केले, त्यापैकी 13.34 कोटी रुपयांचा वापर फसवणुकीसाठी करण्यात आला होता.


इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय, ऑस्ट्रेलियाच्या अडचणीत वाढ