Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश उद्योगपती अंबानी बंधूंवर सेबीने ठोठावला कोट्यवधींचा दंड

उद्योगपती अंबानी बंधूंवर सेबीने ठोठावला कोट्यवधींचा दंड

याप्रकरणात सेबीने ८५ पानांचे आरोपपत्र सादर केले आहे.

Related Story

- Advertisement -

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती अंबानी बंधूंवर सेबीने मोठी कारवाई केली आहे. रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानी तसेच अनिल अंबानी त्यांची पत्नी टीना अंबानी यांच्यावर सेबीने २५ कोटींचा दंड ठोठावला आहे. २१ वर्षे जुन्या असलेल्या एका प्रकरणात अंबानी कुटुंबियांवर ही कारवाई झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे पाच टक्के मर्यादेपेक्षा अधिक शेअर खरेदी करुन कोणतीही माहिती सेबीला न दिल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे.

याप्रकरणात सेबीने ८५ पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. या आरोप पत्रात सेबीने म्हटले की, रिलायन्स उद्योग समुहाच्या प्रवर्तकांनी कंपनीतील आपल्या भागीदारीबाबत सेबीला योग्य माहिती दिली नव्हती. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानी तसेच अनिल अंबानींसह त्यांच्या पत्नी टीना यांचा समावेश आहे. त्यामुळे या चारही जणांवर सेबीने कारवाई केली आहे. याशिवाय के. डी. अंबानी आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

रिलायन्स उद्योग समुहाच्या प्रवर्तकाने २००० साली ६.८३ टक्के शेअर खरेदी केले होते. सेबीच्या नियमानुसार, पाच टक्क्यांहून अधिक शेअर खरेदी केल्यास त्याची माहिती सेबीला देणे आवश्यक आहे. मात्र रिलायन्स शेअर खरेदी केल्याचे विवरण पत्र सेबीला देण्यात अपयशी ठरले. याचदरम्यान २००५ मध्ये अंबानी उद्योग समुहाची दोन बंधूंमध्ये वाटणी झाली होती. यानंतर पेट्रोलियम व्यवसायाशी संबंधित रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानी यांच्या वाटेला गेली. तर, रिलायन्सच्या अन्य कंपन्यांची मालकी अनिल अंबानी यांच्याकडे गेली.


 

- Advertisement -