Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश SEBI NEW CIRCULAR : मुलांच्या नावावरही म्युच्युअल फंडात करता येणार स्वतंत्र गुंतवणूक

SEBI NEW CIRCULAR : मुलांच्या नावावरही म्युच्युअल फंडात करता येणार स्वतंत्र गुंतवणूक

Subscribe

नवी दिल्ली : सिक्युरिटी एक्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) नवा नियम जारी केला आहे. या नियमानुसार मुलांच्या नावांवर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम सोपे केले आहेत. त्यामुळे पालक त्यांच्या स्वतःच्या बँक खात्यातून  मुलांच्या नावे म्युच्युअल फंडात सहज गुंतवणूक करु शकणार आहेत. (Investing in mutual funds for children)

सेबीने म्युच्युअल फंडात मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्यासाठी डिसेंबर 2019 मध्ये अल्पवयीन मुलांच्या नावावर पालकांसोबतचे संयुक्त बँक खात्यामधून अनिवार्य केले होते. पण आता म्युच्युअल फंड ऍडव्हायझरी समितीने आपला 2019 च्या नियमात बदल केला आहे. सेबीने 12 मे रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्याच्या नियमात सुधारणा करण्यात आली आहे. सेबीच्या नव्या नियमामुळे मुलांच्या भविष्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या पालकांना फायदा होणार आहे.

- Advertisement -

सेबीने परिपत्रक क्रमांक (SEBI/HO/IMD/DF3/CIR/P/2019/166) मध्ये अल्पवयीन मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्याच्या नियमात सुधारणा केली आहे. सेबीने म्हटले की, अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या नावाने, आई-वडीलांच्या नावाने किंवा संयुक्त बँक खाते असणे गरजेचे आहे. पण बाजार नियामकाकडून सांगण्यात आले की, अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने म्युच्युअल फंड योजनेत गुंतवलेले पैसे काढण्यासाठी त्यांच्या नावाने बँकेत खाते असणे गरजेचे राहील.

नवीन नियम कधीपासून
सेबीने नवीन नियमांच्या तारखाही निश्चित केल्या आहेत. हा नवा नियम 15 जून 2023 पासून लागू होणार आहे. नवीन नियमांनुसार गुंतवणूक आणि म्युच्युअल फंड काढणे सुलभ करण्यासाठी सेबीने सर्व AMCs ला आवश्यक बदल करण्याचा सल्ला दिला आहे. सेबीच्या या बदलामुळे जे लोक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणार आहेत. त्यांना माोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

एप्रिलमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये 15,900 कोटींची गुंतवणूक
गेल्या महिन्यात सेक्टरल आणि थीमॅटिक फंडांमध्ये गुंतणुकीचा निव्वळ ओघ 3,843 कोटी रुपये होता. तर लार्ज आणि मिड कॅप योजनांमध्ये  2,050 कोटी आणि मिड कॅप फंडांमध्ये  1,575 कोटींची गुंतवणूक झाली.  नऊ प्रकारच्या शुद्ध इक्विटी योजनांद्वारे एकूण 15,900 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. एप्रिल 2021 मध्ये हा आकडा 3,437 कोटी रुपये होता.  इक्विटी फंडांमधील गुंतवणूक जवळपास पाच पटीने वाढली असल्याचे ऍम्फीच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

- Advertisment -