घरताज्या घडामोडीCorona Vaccination: भारतात स्पुटनिक लाईटला मंजुरी अपेक्षित, Sputnik V लसीची दुसरी खेप...

Corona Vaccination: भारतात स्पुटनिक लाईटला मंजुरी अपेक्षित, Sputnik V लसीची दुसरी खेप हैदराबादमध्ये दाखल

Subscribe

संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. २०२१ अखेरिसपर्यंत देशात कोरोनाशी लढण्यासाठी आठ लसी सज्ज असतील, अशी माहिती केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी दिली होती. सध्या देशात दोन लसी लोकांना दिल्या जात आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन. पण आता लवकरच रशियाची स्पुटनिक व्ही लस मिळण्यास सुरुवात होणार आहे. आज स्पुटनिक व्ही लसीची दुसरी बँच हैदराबादमध्ये पोहोचली आहे. यापूर्वी पहिली बॅच १ मेला भारतात पोहोचली होती. १३ एप्रिलला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) स्पुटनिक व्हीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली होती. माहितीनुसार देशात लवकरच रशियाच्या एक डोसवाली लस स्पुटनिक लाईटला देखील मंजुरी मिळू शकते.

येत्या आठवड्यात देशात स्पुटनिक व्ही लस मिळण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. जुलैपासून स्पुटनिक लसीचे उत्पादन देशात सुरू होईल. रशियाच्या गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर आणि रशियन डायरेक्ट इनव्हेट्मेंट फंड यांच्याकडून ‘स्पुटनिक-व्ही’ लस विकसित करण्यात आली. सध्या देशाच्या लसीकरण मोहिमेमध्ये दोन लसीचा वापर केला जात आहे.

- Advertisement -

भारतातील रशियाचे राजदूत निकोले कुदाशेव म्हणाले की, रशियाच्या तज्ज्ञांनी याबाबत घोषणा केली आहे की, ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी असते. सध्या लसीची किंमत ९४८ रुपये असून ५ टक्के जीएसटी प्रति डोसच्या एमआरपीवर आहे.

- Advertisement -

रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF)च्या सीईओ किरिल्ल दमित्रिएव यांनी सांगितले की, रशिया भारताची स्पुटनिक व्ही एक लस आहे. याचे मोठे उत्पादन भारतात केले जाईल. यावर्षी भारतात स्पुटनिक व्हीचे ८५ कोटींहून अधिक उत्पादन केले जाईल, अशी आमची आशा आहे. तसेच लवकरच भारतात स्पुटनिक व्ही लाईट लस देण्याची आमची इच्छा आहे.


हेही वाचा – Corona Steroid : कोरोनाबाधितांना दिल्या जाणाऱ्या अनावश्यक स्टेरॉइंट्सचे गंभीर परिणाम, तज्ज्ञांचा इशारा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -