केरळात आढळला मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण

monkeypox first death in india confirmed thrissur 22 year old dead kerala

केरळमध्ये मंकीपॉक्सचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये मंकीपॉक्सचा एक रुग्ण केरळमध्ये  आढळला होता. आत काही दिवासांतच आणखी एक मंकीपॉक्सचे प्रकरण समोर आले आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी ही माहिती दिली आहे.

आत्तापर्यंत भारतात मंकीपॉक्सची फारशी प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. जगातील 27 देशांमध्ये मंकीपॉक्सची सुमारे 800 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्या ठिकाणी हा विषाणू स्थानिक पातळीवर नाही अशा ठिकाणी हा रोग पसरत आहे.

केरळमधील दोन्ही प्रकरणे विदेशातून आलेली आहेत. मंकीपॉक्स व्हायरल झाल्याची पुष्टी झालेला पहिला रुग्ण दुसऱ्या देशातून भारतात आला होता. त्यानंतर त्याला खूप ताप आणि शरीरात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केली. या प्रकरणी आता दुसरे प्रकरण समोर आले आहे. ही व्यक्तीही दुबईहून भारतात परतली होती. मोठी गोष्ट म्हणजे हा रुग्ण दोन महिन्यांपूर्वीच भारतात परतला होता. मात्र, आता त्याच्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे दिसू लागली आहेत.

पहीला रुग्ण युएईमधला –

या आधी युएईमधून आलेल्या एका तरुणामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळली होती. त्याला केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला ताप आला असून त्याच्या शरीरावर लालसर चट्टे देखील पडले होते, अशी माहिती आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिली.