सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स ५९० अंकांनी घसरला

share market

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. प्री-ओपनिंगमध्येच सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली आहे. ही घसरण शेवटच्या सत्रापर्यंत कायम होती. त्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले आहे.

सेन्सेक्समध्ये आज ५९० अंकांची घसरण झाली आहे. तर ५५.०८२ अंकांवर बंद झाला. तर निफ्टीतही १६४ अंकांची घसरण होत असून १६.४०० वर बंद झाला आहे. आशियाई बाजारातून येणारे संमिश्र संकेत, कच्च्या तेलाच्या किमती आणि कोविड प्रकरणांमध्ये झालेली वाढ यामुळेही सोमवारीही दबाव दिसून आला होता.

महागाई वाढत असल्यामुळे आणि व्याजदरात वाढ होत असल्यामुळे बाजारावर दबाव असल्याचे कोटक सिक्युरिटीचे श्रीकांत चौहान म्हणाले. या आठवड्यात सर्व देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांचे व्याजदर वाढवलेत, ज्याचा परिणाम बाजारावर होत असल्याचेही ते म्हणाले.

शेवटी सेन्सेक्स ९३.९१ अंकांनी म्हणजेच ०.१७टक्क्यांनी घसरून ५५,६७५.३२ वर बंद झाला होता तर दुसरीकडे, निफ्टी १४.७५ अंकांनी म्हणजेच ०.०९ टक्क्यांनी घसरून १६,५६९.५५ वर बंद झाला होता. मागील १४ ट्रेडिंग सत्रात एलआयसीचे बाजार भांडवल कमी झाले असून एलआयसी गुंतवणूकदारांनी ९४ हजार कोटी गमावले आहेत.

एलआयसी शेअर्समध्ये घसरणीचं चित्र कायम

टाटा स्टील, इंडसइंड बँक आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी नोंदविण्यात आली आहे. एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि बजाज फायनान्शिअल्स सर्व्हिससेच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. एलआयसी शेअर्समध्ये घसरणीचं चित्र कायम आहे. आरबीआय बँकेच्या आर्थिक धोरण समीक्षा समितीच्या बैठकीला आजपासून सुरूवात झाली आहे. वाढत्या महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँक आर्थिक धोरणात फेररचना करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.


हेही वाचा : …जर आमदार नाराज असतील तर त्यांचं चुकलं काय?, नाना पटोलेंचा सवाल