घरदेश-विदेश'चांद्रयान २'ची कक्षा यशस्वी बदलली

‘चांद्रयान २’ची कक्षा यशस्वी बदलली

Subscribe

'चांद्रयान २'ची दुसऱ्यांदा यशस्वीरीत्या कक्षा बदलण्यात आली आहे.

‘चांद्रयान २’ हा भारताचा महत्वकांशी प्रकल्प आहे. सोमवारी ‘चांद्रयान २’ने अवकाशात यशस्वी भरारी घेतली. त्यानंतर या यानाची कक्षा बदलण्यात आली आहे. आतापर्यंत दोन वेळा यानाची कक्षा बदलण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, कक्षा बदलण्याचे दोन टप्पे पार करण्यात आले आहेत. पहिली कक्षा दोन दिवसांपूर्वी बदलण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी सकाळी म्हणजेच आज सकाळी इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी ‘चांद्रयान २’ची कक्षा बदलली आहे. यानाची कक्षा टप्प्याटप्याने बदलण्यात येत असून हे यान पृथ्वीपासून २५१ किमी अंतरावर नेण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘चांद्रयान-२’ : चंद्रावर पाणी शोधणारा भारत ठरु शकतो पहिला देश

- Advertisement -

कक्षा बदलल्यानंतर ‘चांद्रयान २’ला ऊर्जा मिळणार

कक्षा बदलल्यानंतर ‘चांद्रयान २’ ला ऊर्जा मिळते. त्यामुळे पुढील दहा दिवसांत आणखी तीन वेळा कक्षा बदलण्यात येणार आहे, असे इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी सांगितले आहे. त्याचबरोबर ‘चांद्रयान २’ ची वाटचाल योग्य मार्गाने जात असल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढचा कक्ष २९ जुलैला बदलण्यात येणार आहे. त्यानंतर २ ऑगस्ट आणि ६ ऑगस्टला कक्ष बदलण्यात येणार असल्याची माहिती वैज्ञानिकांकडून मिळाली आहे.

७ सप्टेंबरला ‘चांद्रयान २’ चंद्रावर पोहोचणार

‘चांद्रयान २’ चा प्रवास अजून ४३ दिवसांचा आहे. यानाच्या पृथ्वाभोवतीच्या आतापर्यंत दोन कक्षा बदलण्यात आल्या असून अजून तीन वेळा कक्षा बदलण्यात येणार आहेत. त्यानंतर हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. तिथे विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होऊन लँडर ७ सप्टेंबर रोजी चंद्रावर उरतेल.

- Advertisement -

हेही वाचा – ‘चांद्रयान-२’ यशस्वीपणे अवकाशात झेपावलं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -