घरदेश-विदेशपतीच्या पेन्शनवर दुसऱ्या पत्नीचाही अधिकार- हायकोर्ट

पतीच्या पेन्शनवर दुसऱ्या पत्नीचाही अधिकार- हायकोर्ट

Subscribe

लष्करी जवानाच्या दुसऱ्या पत्नीच्या कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील हक्काबाबतच्या खटल्यात हा निर्णय दिला आहे.

पतीच्या मृत्यूनंतर पहिल्या पत्नीला काही आक्षेप नसेल तर दुसऱ्या पत्नीला कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि इतर लाभांवर अधिकार असल्याचा निर्णय पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. लष्करी जवानाच्या दुसऱ्या पत्नीच्या कौटुंबिक निवृत्ती वेतनावरील हक्काबाबतच्या खटल्यात हा निर्णय दिला आहे.

लष्कर जवान महेंद्र सिंह यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले होते. महेंद्र सिंह यांनी निधनाआधी दलजित कौर या महिलेशी दुसरे लग्न केले होते. दरम्यान दुसरी पत्नी दलजित कौर यांनी पती महेंद्र सिंह यांच्या निधनानंतर निवृत्ती वेतन आणि इतर लाभ मिळवण्याच्या मागणीसाठी लष्कराच्या कार्यालयात अर्ज केला, मात्र याआधीच त्यांची पहिली पत्नी बंत कौर यांनी नाव नोंदवले होते. यावेळी असेही स्पष्ट झाले की, पहिली पत्नी बंत कौर यांनीही महेंद्र सिंह यांना घटस्फोट न देताच दुसरे लग्न केले होते. परंतु लष्कराच्या रेकॉर्डवर महेंद्र यांची पहिली पत्नी बंत कौर हीचे नाव असल्याने दलजीत कौर यांचे नाव रेकॉर्डवर येऊ शकले नाही. त्यामुळे महेंद्र सिंह यांच्या निधनानंतर भारतीय लष्कराच्या नियमांचा आधार घेत कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि इतर लाभांवर हक्काच्या मागणीला लष्कराने नकार दिला.

- Advertisement -

परंतु पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने निर्णय देत स्पष्ट केले की, महेंद्र सिंह यांनी पत्नी बंत कौरला घटस्फोट न देता दलजित कौर या महिलेशी दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना चार मुलं आहेत. त्यामुळे पहिल्या पत्नीप्रमाणे दुसऱ्या पत्नीलाही पतीच्या मृत्यूनंतर कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि इतर लाभांचा अधिकार देण्यास काहीच अडचण नाही. तसेच लष्कारानेही यावर अधिक लक्ष न घालता दुसरी पत्नी दलजीत कौर यांनाही कौटुंबिक निवृत्ती वेतन आणि इतर लाभ दिला पाहिजे असा निर्णय दिला आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -