हैदराबाद : दुसरी पत्नी “कायदेशीररित्या विवाहित पत्नी” मानली जात नसली तरीही, मृत पतीच्या सेवा आणि अन्य सर्व लाभांसाठी (Terminal benefits) ती पात्र आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती रवीनाथ तिल्हारी आणि न्यायमूर्ती के. मन्मध राव यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
Second Wife Though Not Legally Wedded Entitled To Protection For Service Claims Of Deceased Husband: Andhra Pradesh High Courthttps://t.co/yYA2N61sSA
— Live Law (@LiveLawIndia) August 21, 2023
दिवंगत गद्दाम दानम यांच्या कायदेशीर विवाहित पत्नी जी. रुथ व्हिक्टोरिया यांनी ख्रिश्चन वैयक्तिक कायद्यांतर्गत हा खटला दाखल केला होता. तिने आंध्र प्रदेश प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशाला आव्हान दिले होते. जी. रुथ तसेच दिवंगत गद्दाम दानम यांची दुसरी पत्नी जी. पद्माला या दोघींनाही लाभार्थी म्हणून या आदेशात मान्यता देण्यात आली आहे.
पहिले लग्न अस्तित्वात असताना सुद्धा केलेल्या या विवाहानुसार दुसऱ्या पत्नीला ‘पत्नी’चा दर्जा नसल्याचे दिसत असले तरी, मृत व्यक्तीचे सेवालाभ आणि सेवा संबंधित दावे प्राप्त करण्यास दुसरी पत्नीचा अधिकार आहे, असे आम्हाला वाटते. कायदेशीररित्या ‘विवाहित पत्नी’ या अर्थाने दुसरी पत्नी मानली जात नसली तरी, न्यायालयांचा प्रयत्न नेहमीच दोन पत्नींमध्ये समतोल राखण्याचा असतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा – भ्रष्टाचाराची 6 हजार 841 प्रकरणे विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित, सीव्हीसी अहवालातून खुलासा
दिवंगत पतीच्या मृत्यूनंतर जी. रूथ व्हिक्टोरियाने त्याच्या प्रलंबित लाभांवर दावा केला होता. तथापि, जी. पद्माने देखील या लाभांवर हक्क सांगितल्याचे समोर आले. दुसरी पत्नी जी. पद्मा यांनी दावा केला की ती आणि दिवंगत गद्दाम दानम याने जी. रुथ हिच्याशी विवाह केला होता, पण नंतर 1979मध्ये कौटुंबिक समझोत्यानंतर ते दोघे विभक्त झाले होते आणि नंतर गद्दाम दानम याने 1986 मध्ये आपल्याशी विवाह केला आणि आम्हाला तीन मुले आहेत आणि दानमच्या मृत्यूपर्यंत त्यांची देखभाल करत होते, असे जी. पद्मा हिने सांगितले.
दोन्ही पत्नींना कौटुंबिक पेन्शन समान रीतीने वाटप करावे तसेच दुसरी पत्नी पूर्णपणे सेवा लाभांसाठी पात्र असेल, असा निर्णय न्यायालयाने दिला. शिवाय, 3,60,000 रुपयांची प्रलंबित देखभाल रक्कम पहिल्या पत्नीला देण्यात आली.