घरट्रेंडिंगCyclone Tauktae: चक्रीवादळाला नाव देण्यामागचे जाणून घ्या गिमिक!

Cyclone Tauktae: चक्रीवादळाला नाव देण्यामागचे जाणून घ्या गिमिक!

Subscribe

तौक्ते चक्रीवादळामुळे कर्नाटक, तामिळनाडू, केरळसह महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळाचा जोर एवढा आहे की केरळामध्ये एर्नाकुलम, त्रिशूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनाऱ्या लगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ‘तौक्ते’ चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, या चक्रीवादळाला तौक्ते नाव कसे आणि कोणी दिले. तसेच चक्रीवादाळाला नाव देणे का म्हत्त्वाचे आहे. याविषयी आपण जाणून घेऊया….

तौक्ते हे नाव का?

म्यानमारने ‘तौक्ते’ असे नामकरण केले आहे. तौक्तेचा अर्थ गीको ”Gecko” असा होता. गीको हा बर्मीस येथे आढळणारा सरडा आहे. या सरड्याच्या नावावरून वादळाला नाव देण्यात आले आहे. तसेच यंदा येणाऱ्या वादळाची नावे बुरेवी (मालदीव), तौक्ते (म्यानमार), यास (ओमान) आणि गुलाब (पाकिस्तान) अशी असणार होती. एप्रिल 2020 मध्ये या नावांना मंजुरी देण्यात आली आहे. ही सर्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळे आहेत. यापूर्वी भारतात निसर्ग, अम्फान, क्यार, महा, बुलबुल, वायू, फनी ही चक्रीवादळे आली होती. यापूर्वी 2018 ला ‘गाजा’ नावाच्या वादळाने तामिळनाडूमध्ये प्रचंड नुकसान केले होते. भारतीय हवामान खात्याला चक्रीवादळाची नावे सुचविणे बंधनकारक आहे. त्यासाठी हवामान खात्याला काही प्रक्रियाही पूर्ण कराव्या लागतात. भारतीय हवामान खात्याने यापूर्वी काही चक्रीवादळांची नावे सुचविली होती. यामध्ये अर्णव, निसर्ग, आग, अझर, प्रभंजन तेज, गती व लुलू या नावांचा समावेश आहे.

- Advertisement -

कोण ठरवतं वादळांची नावे?

जागतिक हवामान संघटना, आशिया आणि प्रशांत महासागरासाठीच्या संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोगाने बंगाल आणि अरबी समुद्रात येणाऱ्या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची नावे देण्यासाठी पॅनल निश्चित केले. या पॅनलमध्ये भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या 13 देशांचा समावेश आहे. आठ देशांनी 2004 मध्ये एकत्र येऊन हे पॅनल सुरू केल होते. त्या देशांनी प्रत्येकी 8 अशी एकूण 67 नावांची यादी तयार केली होती. त्या यादीतील अम्फान हे शेवटचे नाव होते. त्यानंतप या यादीत निर्सग हे नाव टाकण्यात आले. त्यानंतर या यादीत निर्सग हे नाव टाकण्यात आले. निसर्ग हे चक्रीवादळाचे नाव भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशने दिले होते. 2018 मध्ये या पॅनलमध्ये आणखी इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि येमेन या पाच देशांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 169 नावांची सुधारित यादी जाहीर करण्यात आली होती. 13 देशांनी प्रत्येकी 13 नावं सुचवली होती.

चक्रीवादळाला नावं दिल्याचा फायदा

चक्रीवादळाला नावं दिल्याने त्यामधून जनजागृती होते आणि मोठ्या प्रमाणात लोकांना धोक्याचा इशाराही परिणामकारकतेने मिळतो. चक्रीवादळाचे नाव राजकारण, लिंग, प्रदेश व संस्कृती यासंदर्भात नसावे, ही हवामान खात्याकडून काळजी घेण्यात येते. चक्रीवादळाचे नाव हे लहान आणि उच्चारण्यास सोपे असण्यावर हवामान खात्याचा भर असतो. विशेषतः ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळाचं नामकरण केलं जातं. चक्रीवादळांची नावे निश्चित केल्याने वैज्ञानिक समुदायाला आपत्कालीन व्यवस्थापनाला मदत होते.

– प्रोफेसर राहुल सातघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -