Maharashtra Assembly Election 2024
घरक्राइमSecurity Breach : संसदेनंतर आता गृहमंत्रालयाची सुरक्षाही भेदली! तरुण अटकेत

Security Breach : संसदेनंतर आता गृहमंत्रालयाची सुरक्षाही भेदली! तरुण अटकेत

Subscribe

 गृहमंत्रालयाची सुरक्षा भंग करण्याचा एका तरुणाचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी हाणून पाडला. दिल्ली पोलिसांनी बनावट ओळखपत्रासह त्यास अटक केली. आदित्य प्रताप सिंग असे आरोपीचे नाव आहे. आदित्य सिंग कोणत्या उद्देशाने बनावट ओळखपत्रासह गृह मंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता, याचा तपास सध्या दिली पोलीस करीत आहेत.

नवी दिल्ली : संसदेत तीन तरुणांनी घुसखोरी करत स्मोक स्कॅंडल फोडले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा दिल्लीतून एक मोठी घटना समोर आली आहे. ती म्हणजे एका तरुणाने बनावट ओळखपत्रासह गृहमंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. सध्या त्या तरुणास पोलिसांनी अटक केली असून, त्याची चौकशी सुरू आहे. (Security Breach After the Parliament the security of the Ministry of Home Affairs has also been breached Young arrested)

गृहमंत्रालयाची सुरक्षा भंग करण्याचा एका तरुणाचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी हाणून पाडला. दिल्ली पोलिसांनी बनावट ओळखपत्रासह त्यास अटक केली. आदित्य प्रताप सिंग असे आरोपीचे नाव आहे. आदित्य सिंग कोणत्या उद्देशाने बनावट ओळखपत्रासह गृह मंत्रालयाच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत होता, याचा तपास सध्या दिली पोलीस करीत आहेत.

- Advertisement -

संसदेवरील हल्ल्याच्या तब्बल 22 वर्षांनंतर 13 डिसेंबर 2023 रोजी संसदेची सुरक्षा भेदत तीन तरुणांनी संसदेत प्रवेश केला होता. यापैकी एकाने स्मोक कॅंडलही फोडले होते. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्याना धारेवर धरले होते. सध्या या घटनेचा बारकाईने तपास सुरू असतानाच त्याच राजधानी दिल्लीतून आज एक मोठी घटना समोर आली. आदित्य सिंग नामक तरुणाने चक्क गृहमंत्रालयाच्या कार्याल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून जरी पाडला असला तरी तो तरुण गृहमंत्रालयाच्या कार्यालयात घुसखोरी कशासाठी करत होता? याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. असे जरी असले तरी मात्र, देशातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी ज्या कार्यालयाकडे आहे त्याच गृहमंत्रालयाची सुरक्षा भेदली गेल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.

हेही वाचा : Esha Deol Divorce :ती मला नेहमी… या सवयींमुळे ईशाचा पती होता नाराज!

- Advertisement -

घुसखोरीमागे दहशतावादाची किनार?

दिल्लीतील नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृहमंत्रालयाच्या कार्यालयात बनावट ओळखपत्राद्वारे घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. सध्या त्याची चौकशी केली जात असून, या घुसखोरी मागे दहशतवादाची किनार आहे का? या बाजुनेही तपास केला जात असल्याची माहिती सध्या पुढे येत आहे. दरम्यान घुसखोरी करणारा तरुण हा कुणाची तरी फसवणूक करण्याच्या उद्देशाने गृहमंत्रालयाच्या कार्यालयात शिरल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अद्याप या घुसखोरीमागील मुख्य उद्देश समोर आला नाही हे विशेष.

हेही वाचा : Supreme Court On Reservation: सधन मागास जातींना आरक्षण कशाला हवं? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्ली पोलीस अलर्ट मोडवर आले असून, संवेदनशील भागात सतर्कता वाढवण्यात आली आहे. सामाजिकदृष्ट्या संवेदनशील भागात दिल्ली पोलिसांकडून विशेष सुरक्षा ठेवली जात आहे. दिल्लीतील सार्वजनिक ठिकाणी बांधलेली धार्मिक स्थळे हटवणे असो किंवा 22 जानेवारीला राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा असो, त्यानंतर ज्ञानवापी येथे पूजेला परवानगी मिळणे असो, अशा मुद्द्यांचा आधार घेऊन लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? या बाजूनेही दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -