काश्मिरी अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलाची धडक कारवाई

काश्मिरी अभिनेत्रीची हत्या करणाऱ्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान, सुरक्षा दलाची धडक कारवाई

जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबार झाला. यादरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये सुरक्षा दलाला यश आले आहे. या दोन दहशवाद्यांनी टीव्ही अभिनेत्री अमरीन भटची त्या केली होती. अभिनेत्रीवर घरासमोर गोळीबार करण्यात आला होता. हत्या झाल्याच्या २४ तासात दहशतवाद्यांचा शोध घेऊन ठार करण्यात आले आहे. सुरक्षा दलाने मागील ३ दिवसांमध्ये १० दहशतवाद्यांना ठार केले आहे.

जम्मू काश्मीरचे आयजीपी म्हणाले की, टीव्ही अभिनेत्री अमरीन भटच्या हत्येचं प्रकरण २४ तासांमध्ये निकाली लावले आहे. खोऱ्यात आतापर्यंत ३ दिवसांमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ३ आणि लष्कर ए तैयबच्या ७ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. दहशतवाद्यांची ओळख बडगामचा रहिवाशी शाहिद मुश्ताक आणि फरहान हबीब रहिवासी हाकारीपोरा पुलवामा अशी झाली आहे. कमांडरच्या लतीफच्या सांगण्यावरुन टीव्ही कलाकार अमरीन भटची हत्या करण्यात आली आहे. घटनास्थळावरुन १ AK56 रायफल आणि ४ मॅग्जिन बंदुकीसह सापडले आहे.

अवंतीपोरामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला दिली होती. याच दहशतवाद्यांनी अभिनेत्रीची हत्या केली होती. सुरक्षा दलाने घेराव घातला होता. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत.

अभिनेत्रीची घरात घुसून हत्या 

बडगामच्या चांदूपारामध्ये अमरीनचे घर आहे. घरात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. तसेच १० वर्षाच्या पुतण्याला गोळी लागली असून तो गंभीर जखमी झाला आहे. श्रीनगर दूरदर्शन केंद्रावरून प्रसारित झालेल्या काही मालिकांमध्ये आणि काही काश्मिरी गाण्यांच्या अल्बममध्ये अमरीनने काम केले आहे. अमरीनवर लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.


हेही वाचा : कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामी करणं IAS संजीव खिरवारांच्या अंगलट! लडाखमध्ये झाली बदली